Header Ads

महसूल विभागाच्या अनेक सेवा सुविधाचा लाभ लाभार्थ्यांना थेट गावात येऊन लोकभिमुख करणार जिल्हाधिकारी अमोल येडगे.

 महसूल विभागाच्या अनेक सेवा सुविधाचा लाभ लाभार्थ्यांना थेट गावात येऊन लोकभिमुख करणार जिल्हाधिकारी अमोल येडगे


राधानगरी: प्रतिनिधी विजय बकरे


महसूल विभागाच्या अनेक सेवा सुविधांचा लाभ लाभार्थ्यांना थेट गावात देऊन महसूलचा कारभार अधिक अधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न सुरू आहे. असे प्रतीपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले .

शासनाच्या सेवा पंधरवडा अभियानचा आढावा घेण्यासाठी श्री.येडगे यांनी मंगळवारी राधानगरी तालुक्यातील सिरसे येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगले हे होते.

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आनंद अतिक्रमण मुक्त अभियान प्रभावीपणे राबवावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या. लक्ष्मी मुक्ती योजना ही एक चळवळ व्हावी आणि त्यातून महिला खऱ्या अर्थाने जमिनीच्या मालक व्हाव्यात अशी अपेक्षाही येडगे यांनी यावेळी व्यक्त केली. 

स्वागत सिरसे च्या सरपंच निकिता कांबळे यांनी  केले. प्रास्ताविक भाषणात ग्राम महसूल अधिकारी पुरुषोत्तम ठाकूर यांनी महसूलच्या विविध योजनांची माहिती  दिली.

यावेळी सरिता पाटील वर्षा पाटील, राणी चव्हाण यांनीही मनोगते व्यक्त केली.

यावेळी तहसीलदार अनिता देशमुख, सहाय्यक गटविकास अधिकारी लालासो मोहिते, माजी सरपंच वसंत पाटील आदी मान्यवरा सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

मंडल अधिकारी प्रवीण पाटील यांनी आभार मानले. 


प्लास्टिक बुकेस विनम्र नकार! 

जिल्हाधिकारी गाडीतून उतरताच त्यांच्या स्वागतासाठी आणलेला बुके सरपंच निकिता कांबळे यांनी पुढे केला. मात्र  प्लास्टिक आवरणातील बुके पाहून आपल्याला जिल्हा प्लास्टिकमुक्त करायचा आहे असे सांगत श्री येडगे यांनी बुके विनम्रपणे नाकारला!

No comments:

Powered by Blogger.