Header Ads

माणगाव येथे युवकाचा संशयास्पद मृत्यू — हातकणंगले पोलीस ठाण्यात नोंद.

 माणगाव येथे युवकाचा संशयास्पद मृत्यू — हातकणंगले पोलीस ठाण्यात नोंद.

----------------------------------

शशिकांत कुंभार 

----------------------------------

हातकणंगले तालुक्यातील माणगाव परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने गावात शोककळा पसरली आहे. येथील भरत भोपाल बन्ने (वय ३२) या तरुणाचा राहत्या घरात संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी साडेनऊ ते अकरा वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली.

भरत बन्ने हे माणगाव फाटा येथे केशकर्तन व्यवसाय (हेअर सलून) चालवत होते. मनमिळाऊ आणि हसतमुख स्वभावामुळे ते सर्वांच्या परिचयाचे होते. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे माणगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सदर घटनेची माहिती माणगावचे पोलीस पाटील करसिद्ध जोग यांनी हातकणंगले पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले.

या प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास बीट अंमलदार सहाय्यक फौजदार चव्हाण करत आहेत. दाखल अंमलदार म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल डिसोजा यांनी नोंद केली आहे.

भरत बन्ने यांच्या निधनाने माणगाव व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

No comments:

Powered by Blogger.