नेहरू मैदानावरून राजकीय रणकंदन — भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, काँग्रेसची टीका
नेहरू मैदानावरून राजकीय रणकंदन — भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, काँग्रेसची टीका.
--------------------------------------------अमरावती शहरातील नेहरू मैदानावर महापालिकेची इमारत उभारण्याच्या निर्णयावरून राजकीय संघर्ष पेटला आहे. राज्यात महायुतीचे सरकार असले तरी अमरावतीत मात्र महायुतीच्या घटक पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव स्पष्ट झाला आहे.
भाजपने नेहरू मैदानावर इमारत उभारण्यास विरोध दर्शवून “मैदान बचाव व संवर्धन कृती समिती” स्थापन केली आहे. खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील, भाजप प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, माजी महापौर किरण महाले आदींच्या उपस्थितीत रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके यांनी मैदानावर इमारत उभारण्यास विरोध व्यक्त केला, तर काँग्रेस नेते डॉ. सुनील देशमुख यांनी “ही कृती शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा अपमान” असल्याची तीव्र टीका केली.
भाजपने स्पष्ट केले की, “नेहरू मैदान हे अमरावतीचे ऐतिहासिक वारसास्थळ असून येथे कोणतीही वास्तू उभी राहू देणार नाही. शहरातील कमी उरलेल्या मैदानांचे संरक्षण आवश्यक आहे.”
स्वातंत्र्यपूर्व काळात अमरावतीकरांनी याच मैदानावर स्वराज्याची शपथ घेतल्याने या मैदानाचे भावनिक व ऐतिहासिक महत्त्व आजही कायमआहे
No comments: