Header Ads

लोकनेते खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या जयंतीनिमित्त ४ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा .

 लोकनेते खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या जयंतीनिमित्त ४ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा.


 मुरगूड/ जोतीराम कुंभार

    कोल्हापूर जिल्ह्याचे लोकनेते स्व. खासदार सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या ९१व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.शनिवार दि. ४ ऑक्टोंबर २०२५ रोजी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ लेखक मा. प्राचार्य . डॉ.जी. पी. माळी (कोल्हापूर) यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जय शिवराय एज्युकेशन सोसायटी मुरगूड या संस्थेचे सेक्रेटरी मा. खासदार प्रा. संजयदादा मंडलिक भूषविणार आहे आहेत. या कार्यक्रमासाठी जय शिवराय एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मा.  गजाननराव गंगापुरे कार्याध्यक्ष मा. ॲड. वीरेंद्र मंडलिक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

     या स्पर्धेसाठी १)लोकनेते खा. सदाशिवराव मंडलिक : व्यक्तिमत्व आणि कार्य, २)पारंपरिक सण : उत्सव की इव्हेंट?, ३)प्राकृतिक असमतोल : विनाशाची नांदी!, ४) ऑपरेशन सिंदुर : विजयाची शौर्य गाथा, ५)आनंदी जीवनाची गुरुकिल्ली… हे विषय आहेत.ही महाराष्ट्रातील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाची एक नामवंत स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते हे वक्तृत्व स्पर्धेचे 24 वे वर्ष आहे. महाराष्ट्र राज्यातील या वक्तृत्व  स्पर्धेसाठी स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.

       या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांक रु.५००१/- चषक व प्रमाणपत्र

द्वितीय क्रमांक -रु.३००१/- चषक व प्रमाणपत्र 

तृतीय क्रमांक - रु.२००१/- चषक व प्रमाणपत्र 

तर उत्तेजनार्थ १,०००/- एकूण सात पारितोषिके ठेवली आहेत. या स्पर्धेतील स्पर्धकांना सर्वांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ . जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह मा. अण्णासाहेब थोरवत यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमासाठी श्री. दत्तात्रय सोनाळकर, मा.अनिल राऊत,  संदीप मुसळे, मा. शिवाजी अ. चौगुले उपस्थित राहणार आहेत.


सोमवार दिनांक ६  ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता रानभाज्यांचे प्रदर्शन व पाककला स्पर्धा  उद्घाटन मा. सौ संजना वीरेंद्र मंडलिक यांच्या शुभहस्ते होणार आहे. या 

कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून वन अभ्यासक पर्यावरण तज्ञ दत्ता मोरसे  यांचे अरण्य भाषा समाज व मानव या विषयावर मार्गदर्शन होणार आहे . मंगळवार दिनांक 7 ऑक्टोंबर रोजी लोकनेते खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रतिमेला अभिवादन या संपूर्ण कार्यक्रमांची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य .डाॅ.शिवाजी होडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपप्राचार्य डॉ .एस बी पोवार संयोजक प्रा.दादासाहेब सरदेसाई, डॉ.सुखदेव एकल, प्रा. नितेश रायकर उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.