कोल्हापुरात शाही दसरा सोहळा उत्साहात संपन्न
कोल्हापुरात शाही दसरा सोहळा उत्साहात संपन्न.
कागल -सलीम शेख
कोल्हापूर : दसरा चौक येथे गुरुवार, २ ऑक्टोबर २०२५ रोजी ऐतिहासिक 'शाही दसरा' सोहळा मोठ्या उत्साहात आणि परंपरेनुसार पार पडला. कोल्हापूरकरांचा ऐतिहासिक वारसा आणि अभिमानाचं प्रतीक असलेला हा सोहळा दसरा चौक येथे आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्यात खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते शमीपूजन करण्यात आलं. यावेळी संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे आणि यशराज राजे यांची प्रमुख उपस्थिती होती. शमीपूजन झाल्यानंतर खासदार शाहू छत्रपती महाराजांनी सर्व मान्यवर आणि कोल्हापूरकरांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.
हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी आणि सहभागी होण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केली होती.या सोहळ्यास पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर, राज्याचे मंत्री नामदार हसन मुश्रीफ, 'पुढारी'चे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, राहुल आवळे, अशोक माने, शिवाजी पाटील यांची उपस्थिती होती.
याव्यतिरिक्त, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक के. मंजुलक्ष्मी, जि.प. सीईओ कार्तिकेयन एस. यांच्यासह प्रमुख शासकीय अधिकारी आणि कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक आणि शाही थाटात संपन्न झालेल्या या सोहळ्यामुळे कोल्हापूरच्या ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडले.
No comments: