शिरोळच्या स्वाभिमानाची लढाई म्हणून शिरोळ नगराध्यक्षपदाची निवडणूक सौ. श्वेता विश्वास काळे लढवण्याची शक्यता ...!
शिरोळच्या स्वाभिमानाची लढाई म्हणून शिरोळ नगराध्यक्षपदाची निवडणूक सौ. श्वेता विश्वास काळे लढवण्याची शक्यता ...!
--------------------------------------शिरोळ /प्रतिनिधी : नामदेव भोसले.
---------------------------------------
शिरोळ नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला प्रवर्गसाठी आरक्षित झाले आहे. शहरातील जनतेच्या आग्रहास्तव आणि स्वाभिमानी शिरोळकरांच्या दबावामुळे नगराध्यक्ष पदाची निवडणूक सौ. श्वेता विश्वास काळे लढवण्याची शक्यता जोर धरली आहे. निवडणुकीच्या दृष्टीने त्यांचे पती विश्वास उर्फ दादासाहेब काळे शिरोळच्या जनतेची मते आजमावून घेत आहेत आणि शिरोळच्या स्वाभिमानाची लढाई म्हणून मतदारांच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे.
मुळातच दादा काळे चळवळीच्या मुशीतून घडलेले आहेत. विश्वास उर्फ दादा काळे यांनी आजवर गेल्या तीस वर्षात अनेक शेतकरी आंदोलनातून शेतकरी प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका घेतली. कर्जबाजारी शेतकरी व जनतेच्या पाठीशी खंबीर उभे राहून सुलतानी कर्जवसुलीला विरोध करत 'चाबूकफोड आंदोलन' केले, जे संपूर्ण महाराष्ट्रात गाजले होते. शिरोळ तालुक्यामध्ये आजही शेतकऱ्यांची जप्ती वसुली, लिलाव आदी प्रकार होत नाहीत. तसेच शिरोळ तालुक्यातील अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी अनेक आंदोलन केलेली आहेत. कित्येकदा या आंदोलनाची झळ बसून वेळप्रसंगी तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला आहे.
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात कोणत्याही पदाविना ते कार्यरत राहून नागरिकांच्या सुख दुःखात सहभागी असतात. सर्व शिरोळकर नागरिकांच्या मागणी आणि भावनेचा आदर राखत यावेळी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सौ. श्वेता विश्वास काळे उतरतील असा राजकीय अभ्यासकांचा अंदाज आहे.
चौकट :
सौ. श्वेता विश्वास काळे या स्वतः उच्चशिक्षित असून त्यांना शिरोळ शहरातील सामाजिक प्रश्नांची जाण आहे. विशेषतः शहरातील जनतेला शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन हे प्रश्न सोडवण्याबरोबरच शहरवासीयांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण करतील अशी शिरोळ शहरवासीयांना अपेक्षा आहे. शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत रचनात्मक व विकासात्मक शहर म्हणून शिरोळ शहराची ओळख निर्माण करून भ्रष्ट्राचार मुक्त, स्वच्छ प्रशासन आणि पारदर्शक कारभार यासाठीच त्यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवावी, अशी भावना समस्त शिरोळकर व्यक्त करीत असल्याचे पाहायवास मिळते.
No comments: