पेठ वडगाव ते स्पर्शभूमी माणगाव धम्म रॅलीचे उत्साहात स्वागत,
पेठ वडगाव ते स्पर्शभूमी माणगाव धम्म रॅलीचे उत्साहात स्वागत, माणगाव फाटा येथे मान्यवरांनी केले अभिवादन; भीम अनुयायांचा मोठा सहभाग.
सुपर भारत -शशिकांत कुंभार
हातकणंगले: धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून आज, गुरुवार दि. ०२ ऑक्टोबर, २०२५ रोजी पेठ वडगाव येथून स्पर्शभूमी माणगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे भव्य धम्म रॅली काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, त्या पवित्र घटनेला अभिवादन करण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली होती.
पेठ वडगाव येथून निघालेल्या या धम्म रॅलीचे माणगाव फाटा येथे स्थानिक मान्यवरांनी अत्यंत उत्साहात स्वागत केले. रॅलीतील भीम अनुयायांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती यावेळी उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित मान्यवर:
हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती महेश पाटील
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती किरण कांबळे
ग्रामपंचायत सदस्य संदीप कांबळे
संजय जिंदे आदी मान्यवरांनी रॅलीतील उपस्थितांना अभिवादन केले आणि धम्मचक्र परिवर्तन दिनाचे महत्त्व विशद केले.
धम्म रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला आणि विचारांना आदराने वंदन केले. शांतता आणि एकतेचा संदेश घेऊन निघालेली ही रॅली स्पर्शभूमी माणगाव येथे पोहोचून संपन्न झाली. या कार्यक्रमासाठी परिसरातील भीम अनुयायी आणि बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments: