Header Ads

आकाशवाणी अमरावतीचे प्रसारण अधिकारी आशिष गावंडे यांचा श्रोता महासंघाकडून सत्कार

 आकाशवाणी अमरावतीचे प्रसारण अधिकारी आशिष गावंडे यांचा श्रोता महासंघाकडून सत्कार.


अमरावती (प्रतिनिधी – पी. एन. देशमुख)

अखिल भारतीय रेडिओ श्रोता महासंघाच्या वतीने आकाशवाणी अमरावती केंद्रातील नव्याने रुजू झालेल्या प्रसारण अधिकारी आशिष गावंडे यांचा सत्कार करण्यात आला.


अखिल भारतीय रेडिओ श्रोता महासंघाचे सचिव संजय वाघुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावती केंद्रावर झालेल्या या कार्यक्रमात शहा कय्यूम शहा, संजय सरवटकर, गजानन जिरापुरे आदी श्रोता बंधू उपस्थित होते.


गावंडे हे मुंबई येथील विविध भारती राष्ट्रीय सेवा विभागातून बदली होऊन अमरावती येथे १ सप्टेंबर २०२५ रोजी रुजू झाले.

या प्रसंगी आकाशवाणीचे वरिष्ठ उद्घोषक संजय ठाकरे यांनी नव्या अधिकाऱ्यांचा श्रोत्यांशी परिचय करून देत पुढील कार्यपद्धतीबाबत मौल्यवान मार्गदर्शन केले.

श्रोता महासंघाच्या वतीने विविध प्रसारणासंबंधी सूचना, मागण्या आणि अपेक्षा मांडण्यात आल्या. त्यावर प्रत्युत्तर देताना प्रसारण अधिकारी आशिष गावंडे म्हणाले,

 “सार्वजनिक प्रसारण सेवेला अधिक परिणामकारक आणि लोकाभिमुख बनविण्यासाठी श्रोत्यांच्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून प्रसारणाची गुणवत्ता आणि विषयवैविध्य वाढविण्याचे प्रयत्न केले जातील.”

या वेळी श्रोता महासंघाने गावंडे यांना निवेदन सादर केले. कार्यक्रमात पत्रकार प्रशांत बैस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे मनःपूर्वक स्वागत केलं.

No comments:

Powered by Blogger.