Header Ads

पट्टणकोडोली येथील तांबड्या तलावात मासेमाराचा दुर्दैवी मृत्यू.

 पट्टणकोडोली येथील तांबड्या तलावात मासेमाराचा दुर्दैवी मृत्यू.

---------------------------------

सुपर भारत- शशिकांत कुंभार 

----------------------------------

कोल्हापूर : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील तांबड्या तलावात मासेमारी करत असताना एका मासेमाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वसगडे गावातील दिलीप रामचंद्र नरशिंगे (वय ५८) असे मृत्यू झालेल्या मासेमाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप नरशिंगे हे नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी तांबड्या तलावात गेले असता कमळाच्या फुलांच्या जाळ्यात अडकून गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर तलाव परिसरात एकच खळबळ उडाली.

दिलीप नरशिंगे हे व्यावसायिक मासेमार असून त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेची नोंद हुपरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक अशोक चव्हाण, विकास शिंदे  पुढील तपास करीत आहेत.

No comments:

Powered by Blogger.