विदर्भ- मराठवाड्यातील आपत्तीग्रस्तांना इंद्रजित भिलारे यांचा मदतीचा हातभार 🌩️ इंद्रजीत मोहन भिलारेअध्यक्ष शेतकरी वेलफेअर फाउंडेशन महाराष्ट्र राज्ययांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम न करता पुरग्रस्थांना मदतकरूण सामाजिक कार्याची परंपरा जपली.
विदर्भ- मराठवाड्यातील आपत्तीग्रस्तांना इंद्रजित भिलारे यांचा मदतीचा हातभार 🌩️
इंद्रजीत मोहन भिलारेअध्यक्ष शेतकरी वेलफेअर फाउंडेशन महाराष्ट्र राज्ययांच्या
वाढदिवसाचा कार्यक्रम न करता पुरग्रस्थांना मदतकरूण
सामाजिक कार्याची परंपरा जपली.
प्रतिनिधी /शेखर जाधव
सातारा/जावली:-विदर्भ आणि मराठवाडा या भागांत अलीकडच्या काळात झालेल्या अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर समाजातल्या प्रत्येकाने संवेदनशीलतेने पुढे येऊन मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा केली जात असतानाच एक युवा नेता, सामाजिक जाणीव उराशी बाळगणारा इंद्रजित भिलारे यांनी आदर्श उभा केला आहे.
नेहमीप्रमाणे आपला वाढदिवस मोठ्या थाटामाटात, भव्यदिव्य कार्यक्रमात साजरा करण्याऐवजी त्यांनी या वर्षी वेगळी वाट निवडली. कार्यकर्त्यांसह एकत्र येऊन त्यांनी रु. २१,०००/- चा मदतीचा धनादेश मा.ना. बाबाराजे यांच्याकडे सुपूर्द केला. या उपक्रमामुळे वाढदिवसाचा दिवस हा केवळ आनंदाचा न राहता सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारा ठरला.
वाढदिवशी समाजकारणाला प्राधान्य
इंद्रजित भिलारे यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे नियोजन केले होते. पण त्यांनी तो सर्व सोहळा बाजूला ठेवून “समाजकारण हीच खरी सेवा” या भूमिकेतून मदतीचा हात पुढे केल्याने कार्यकर्त्यांसह सर्व हितचिंतकांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
नम्र, प्रामाणिक आणि सामाजिक भान असलेला नेता
इंद्रजित भिलारे हे नेहमीच निगर्वी, हाकेला ओ देणारे, साधे आणि सरळ स्वभावाचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रत्येक कार्यात समाजाची जाणीव आणि प्रामाणिकपणा जाणवतो. त्यामुळेच वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी घेतलेली ही पुढाकारात्मक भूमिका लोकांच्या मनाला भिडणारी ठरली आहे.
हितचिंतकांचा आशिर्वाद कायम पाठीशी
या उपक्रमामुळे आपत्तीग्रस्त शेतकरी व नागरिकांकडूनच नव्हे तर सर्व समाजबांधवांकडून त्यांना भरभरून आशिर्वाद लाभत आहेत. मित्रपरिवार व कार्यकर्त्यांकडून मिळणाऱ्या शुभेच्छांसोबतच पिडीत बांधवांचे आशीर्वाद हीच खरी भेट असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
आजच्या काळात ज्या वेळी वाढदिवस हे केवळ औपचारिक व दिखाऊ कार्यक्रमांचे प्रतीक झाले आहे, त्याच वेळी इंद्रजित यांनी केलेली मदतीची कृती हा एक सामाजिक संदेश ठरला आहे. त्यांनी दिलेला हा आदर्श आगामी पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.
फोटो ओळ:
पूरग्रस्त शेतकऱ्यांना 21 हजाराचा चेक देताना मा. मंत्री महोदय श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रतापगड सहकारी साखर कारखाना चेअरमन सौरभ बाबा शिंदे ,जावली तालुका तहसीलदार श्री हनुमंत कोळेकर साहेब ,प्रतापगड साखर कारखाना संचालक दादा पाटील व्हाईस चेअरमन एडवोकेट मर्ढेकर साहेब यांच्या धनादेश सपुर्त करताना श्री. इंद्रजीत मोहण भिलारे साहेब
No comments: