मानेवाडी येथील सौ अश्विनी माने या विवाहितेचा मृतदेह विहिरीत सापडला
मानेवाडी येथील सौ अश्विनी माने या विवाहितेचा मृतदेह विहिरीत सापडला.
राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे
राधानगरी तालुक्यातील मानेवाडी येथील सौ अश्विनी माने या विवाहित महिलेचा मृतदेह गावातील विहिरीत मिळून आला असल्याची माहिती राधानगरी पोलिसांनी दिली
या बाबत अधिक माहिती अशी की मानेवाडी येथील सौ अश्विनी प्रल्हाद माने वय वर्षे 28 ही दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता घरात कोणास न सांगता निघून गेली होती ती परत आली नाही म्हणून घरच्यांनी पै पाहुणे नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला पण आज सकाळी साडेनऊ वाजता गावातील लोकांनी शिवाजी गोविंद माने यांच्या तळीच्या शेताजवळील तिट्याच्या ओढ्याजवळ विहिरीच्या काठावर चप्पल दिसल्याने विहिरी जवळ जाऊन शरद सर्जेराव माने यांनी गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीच्या पाण्यामध्ये शोध घेतला असता सौ अश्विनी माने हिचा मृतदेह मिळून आला असून याबाबतची फिर्याद मयत अश्विनी माने हिचादीर शरद माने याने राधानगरी पोलीस स्टेशनला बुडून मयत झाले असल्याची फिर्याद दिली
याबाबत अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल सूर्यवंशी व पाटील हे करत आहेत
No comments: