बलराम दूध संस्थेचा शेतकरीहिताचा निर्णय : जनावर दगावल्यास आर्थिक मदत.
बलराम दूध संस्थेचा शेतकरीहिताचा निर्णय : जनावर दगावल्यास आर्थिक मदत.
********************
कळे प्रतिनिधी
साईश मोळे
********************
कळे :- येथील बलराम दूध संस्थेच्या वार्षिक सभेत शेतकऱ्यांच्या हिताचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. दुभते जनावर दगावल्यास दूध उत्पादकास पाच हजार रुपयांची आर्थिक मदत संस्थेकडून देण्यात येईल, असा ठराव सर्वानुमते मंजूर झाला.
सभेच्या कामकाजात सन २०२४-२५ चा अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रके, घट-वाढ पत्रक यांना मंजूरी देण्यात आली. तसेच सन २०२५-२६ चे अंदाजपत्रक सभेत मंजूर झाले. उत्साही व खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या चर्चेत सभासदांनी विविध प्रश्न उपस्थित केले.
दुभते जनावर दगावल्यास शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मोठी आर्थिक हानी होते. त्यामुळे पाच हजार रुपयांची मदत देण्याची मागणी संतोष डवंग यांनी केली. सभासदांनी एकमताने ती मंजूर केली.
यावेळी अध्यक्ष प्रसाद पाटील, उपाध्यक्ष प्रसाद चव्हाण, रंगराव खांबे, शिवाजी इंजुळकर, पुंडलिक कदम, बाळू इंजुळकर, अक्षय पाटील, सरदार पाटील, सौरभ जरग यांच्यासह सर्व सभासद उपस्थित होते. सचिव पंकज इंजुळकर यांनी विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन केले.
कोल्हापूर विभाग.
No comments: