जयसिंगपूर नगरपालिकेत सत्तांतराची चाहूल!
जयसिंगपूर नगरपालिकेत सत्तांतराची चाहूल!
संजय पाटील यड्रावकर यांच्या हलगर्जीपणामुळे भाजपचा ताबा होण्याची शक्यता – नागरिक व वरिष्ठ पत्रकारांमध्ये चर्चा रंगली
शब्द देऊन पलटी मारणाऱ्या नेत्यावर नगरसेवक नाराज; ३०० कोटींच्या कामांवर संशयाची सावल
------------------------------------------जयसिंगपूर, प्रतिनिधी : नामदेव भोसले .
--------------------------------------------
जयसिंगपूर नगरपालिकेत राजकीय वादळ उठण्याची चिन्हे दिसत असून, सध्याच्या सत्ताधारी गटाच्या हलगर्जीपणामुळे नगरपालिकेचा ताबा भारतीय जनता पक्षाकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काल झालेल्या वरिष्ठ पत्रकारांच्या चर्चेत या विषयावर तीव्र चर्चा रंगली.
एका नगरसेवकाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, “शब्द देऊन पलटी मारणारा नेता आणि त्याच्या जवळच्या नगरसेवकांमुळे संपूर्ण गट असंतुष्ट झाला आहे.”
संजय पाटील यड्रावकर यांच्या निर्णयशैलीवर तसेच नगरपालिकेतील गटबाजीवर नाराजी वाढत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, नागरिकांमध्ये मुख्याधिकारी टिना गवळी, माजी उप नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, आणि व्ही.डी.के.चे विक्रम गायकवाड यांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. जनतेच्या म्हणण्यानुसार, शहरातील विविध विकासकामांमधून सुमारे ३०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या आरोपांबाबत अधिकृत पुष्टी नसली तरी, शहरात “नगरपालिका हातातून जाण्याची ९९ टक्के शक्यता” अशी चर्चा सध्या जोर धरत आहे. सत्ताधारी गटात मतभेद वाढत असल्याने विरोधकांना संधी मिळत असून, भाजप कार्यकर्ते या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.
आगामी काही दिवसांत सत्ताबदलाची हालचाल वेग घेण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.
No comments: