Header Ads

प्रेमाचा फाटा


प्रेमाचा फाटा .

.................................................

 लेखक.श्री.तानाजी सखाराम कांबळे

..................................................

 कुछ होश नही रहता,

 कुछ ध्यान नही रहता, 

 इंसान मोहब्बत मे इंसान नही रहता !

..................................................

 होशवालों को खबर क्या?

 बेखुदी क्या चीज है!

 इश्क किजीये फिर संभललिये,

 जिंदगी क्या चीज है!

..................................................

उनसे नजरे क्या मिली,

रोषण फिजाये हो गये!

आज जाना प्यार की,

जादुगरी क्या चीज है?

इश्क किजीये,फिर संभलीये,

जिंदगी क्या चीज है!

होशवालों को खबर क्या,बेखुदी क्या चीज है!

.............................................,...

त्याच्या आयुष्यातलं त्याला खरं केलेल प्रेम कधीच मिळालं नाही.मात्र त्याच्या साठी अनेक संधी नी दार उघड ठेवलं होतं मात्र ऐन वेळेला संधी त्याला हुलकावणी देत होती.

सन 2001 चा तो काळ होता,विद्यापीठाच्या लॉ कॉलेजची नूतन बिल्डिंग बांधकामाचे काम त्यावेळी जोमाने सुरू होते.आणि त्याचं प्रथम इयर वर्षासाठी,लॉ कॉलेजला बी एस एल एल बी या पदवीसाठी ऍडमिशन पडलं होतं.

लॉ कॉलेजला अनेक श्रीमंतांच्या मुलांनी त्यावेळी ऍडमिशन घेतलं होतं.

बारा एकजुटीच एकजूटच गाव म्हणून त्यावेळी ते चंदगड तालुक्याची खास ओळख जिल्ह्याच्या राजकीय रजत पटला वरती होती.यातील एका पाटलांच्या जवळचे नातेवाईक,

त्यावेळी गडहिंग्लज चा नदी किनाऱ्याची वेस,असलेल्या गावाशेजारील सहाय्यक फौजदाराचा मुलगीने नवीनच ऍडमिशन घेतले होते.

लॉ कॉलेजच्या पदवीला इंग्रजीवर प्रभुत्व असणारी अनेक श्रीमंतांची मुले त्यावेळी आपल्या बोलीभाषेवरती घट्ट स्थान पकडून होती.रंकाळा एसटी स्टँड ते पेठेच्या रस्त्यालगत असणार्‍या कॉलेजला जाण्याची चालत जाणारी नेहमीची त्याची वाट होती.

इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नसलेल्या त्याच्या,अन्य सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याच्या भाषेवर प्रभुत्व जोरदार होते.भाषणबाजी मध्ये तरबेज असणार्‍या त्या पट्ट्याच्या भाषणावर त्या मुलगीचा जीव इतका बसला की, कॉलेज जीवनामधील त्याचं प्रेम,तिच्या कडून येणाऱ्या प्रतिसादामुळे रुळावर येऊन ठेवलं होतं.

त्या दोघांच्या मैत्री वजा प्रेमाची चर्चा कॉलेजच्या कट्ट्यावर ती दुपारी बारानंतर हमखास सुरू व्हायची.कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात अचानक तिने त्याच्या समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता.

आणि त्याच्या काळजात अचानक धस्स काहीतरी होऊन गेलं.त्याला आठवलं ते स्वतःचं घर,भर पावसामध्ये मुद्दामून घरातल्या जमिनीवरती येणारा भरगच्च ओलावा,त्याला त्याच्या अठराविश्व दारिद्र्य ची सतत आठवण करून देत होता. दुसऱ्याच्या शेतात आईचे दारा पाठीमागून रोजगाराला जाण, अंन,फुलेवाडी च्या बाळा पाटलाच्या गुऱ्हाळ घरावरती वडलाच घाण करी म्हणून कामाला जाण,गडिंग्लजचां नदी किनाऱ्यालगत असणाऱ्या पोलीस स्टेशनआतील तिचा तो सहाय्यक फौजदाराचे बापासमोर त्याला अशा पद्धतीच्या प्रेमाचा स्वीकार करन मनापासून योग्य वाटत नव्हतं.

श्रीमंती पुढे गरिबी नेहमी हरते 

याची त्याला खात्री झाली होती.

आणि याच भीतीपोटी निकाल लागायच्या आदल्यादिवशी दुसऱ्या वर्षी,

तो तिला,आपल्या बरोबर विद्यापीठाच्या रोड कडे पायी चालत येऊन गेला.बी-बियाणे संशोधन केंद्राच्या दारासमोर त्याने तिला,लग्नाच्या प्रस्तावाला पूर्णतःआपला विरोध दर्शवला,आण ती,चांगली हिरमुसली गेली.

फौजदाराची लेक आण जिद्दी असल्यामुळे,प्रेमाच्या नकाराचे शल्य तिला बोचू लागल्याने शेवटच्या महिन्यात एकमेकांच्या नजरेला नजर भिडत नव्हती.

त्याच्या मनाची होणारी घालमेल, ती समजून घेण्याच्या अजिबात मनस्थितीत नव्हती.शेवटी त्याने लॉ कॉलेजच्या दोन वर्षातच,निरोप घेऊन फुलेवाडी च्या बाळा पाटलाच्या,गुराळ घरावरती घाण करी म्हणून आपल्या बाप्पा सोबत काम करावयास सुरुवात केली.

वर्षे निघून गेलीत,त्याने आपल्या जातीतली मुलगी बघून लग्न केले,मात्र सात-आठ वर्षांच्या काळानंतर,त्याची बायकोही त्याला सोडून गेली. त्यानं जीवापाड प्रेम केलेल्या त्याच्या एका खास माणसाला पोलिसांनी,अटक करून न्यायालयासमोर हजर केले होते.त्याला जामीन मिळावा यासाठी तो अतिशय तळमळीने धडपडत होता.आणि त्याच वेळी जिल्हा सत्र न्यायालयाच्या चौथ्या मजल्यावर ती त्याला अचानक,वकिलीचा काळा कोट घातलेली त्याची ती पूर्व आयुष्यातली प्रेयसी,समोर दिसली.

नजरेला नजर घासून गेली.डोळ्यातील दाटून आलेली आसवे औंढा गिळल्याप्रमाणे मनातल्या मनात वाहत होती.त्याच्या समोर असणारी पूर्वाश्रमीची ती त्याची प्रेयसी आता एक नामांकित,वकील म्हणून ओळख निर्माण केली होती. तिच्या चेहऱ्याकडे बघत मान खाली घालून त्याने चाचपडत चाचपडत तिच्या सोबत बोलायला सुरुवात केली,अन त्याच्या प्रतिक्षे पोटी,त्याच्या आज ना उद्या मिळणाऱ्या होकार पोटी,

तिच्या वयाची पस्तिशी ओलांडल्यानंतर देखील तिने लग्न केले नव्हते ही गोष्ट त्याला समजल्यानंतर,त्याच्या अश्रूंचा बांध फुटला व,तो तडक चौथ्या मजल्यावरून पायी खाली चालत चालत,बाळा पाटलाच्या गुराळ घरावरती जामीना करता पैसे आणण्याकरता गेला.

आणि त्याला आपल्या नशिबाची थट्टा मांडली गेलेली आठवू लागली.

एक जिच्या सोबत त्यांन लग्न केलं ती त्याला सोडून गेली,जिच्या वरती त्यानं नंतर मनापासून प्रेम केलं तिला पोलिसांनी काही कारणाने अटक केली होती. आणि जिने त्याच्यासाठी वयाची पस्तिसावी,बिनलग्नाची ओलांडले,

या तिन गोष्टीमुळे त्याचं मन अगदी कासावीस झालं होतं.

गुराळ घरावरचे उसाचं रिकाम गाळप करून झालेले चिपाड,डालग्यात भरून,ऊपराट्या दिशेने जाताना,

त्याच्या प्रेमाच्या त्रिकोणाची झालेली चित्तरकथा त्याला,पुन्हा पुन्हा आठवत होती.रसानं खचखचित भरलेल्या उसाच्या गाळप झाल्यावर रिकाम्या झालेल्या,उसाच्या चिपाडापा सारखे,

त्याच्या असंवेदनशील प्रेमाचे गाळप झाले होते.

.................................................................

No comments:

Powered by Blogger.