Header Ads

विश्वंभरबाबा कार्तिकी पायी दिंडीचे 8 नोव्हेंबर रोजी आळंदी कडे प्रस्थान*

 विश्वंभरबाबा कार्तिकी पायी दिंडीचे 8 नोव्हेंबर रोजी आळंदी कडे प्रस्थान.

प्रतिनिधी शेखर जाधव 

सातारा जावली  :- विश्वंभरबाबा कार्तिकी पायी दिंडी सोहळा जावळी मेढा विभाग यांचे वतीने गांजे - मामुर्डी ते आळंदी पायी दिंडी सोहळा प्रस्थान होणार आहे या दिंडी सोहळ्याता  65 वर्ष पूर्ण होत आहेत. प्रातः स्मरणीय वै.गुरुवर्य ह भ प भिकोबा महाराज देशमुख गांजे यांच्या कृपाशीर्वादाने, त्यांचे नातू ह भ प अतुल महाराज देशमुख गांजे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतीवर्षी प्रमाणे विश्वंभरबाबा कार्तिकी पायी दिंडी सोहळा जावळी मेढा विभाग शनिवार दिनांक 8/11/2025 रोजी गांजे येथून समस्त ग्रामस्थांच्या वतीने  तसेच वै. ह भ प अनाजी महाराज मामुर्डी वै. ह भ प हरि बुवा महाराज चोरांबे यांच्या शुभाशीर्वादाने, ग्रामस्थांच्या सहकार्यातून मामुर्डी, चोरांबे येथून निघणार आहे. तसेच मेढा या ठिकाणी आल्यानंतर सर्व वारकरी भाविकांना एकत्र घेऊन 

श्री विठ्ठल मंदिर मेढा येथून आळंदीकडे प्रस्थान करणार आहे. यामध्ये मौजे सरताळे, सुरूर परीठ मळा, पारगाव खंडाळा, शिंदेवाडी, शिवरे, पुणे, या प्रत्येक गावी  मुक्काम करीत अलंकापुरी आळंदी येथे शुक्रवार दिनांक 14 /11/2025 रोजी पोहोचणार आहे.    प्रतिवर्षीप्रमाणे प्रत्येक गावचे ग्रामस्थ. तसेच अन्नदाते सर्व वारकऱ्यांची राहण्याची तसेच अल्पोपहार, दुग्धपान ,महाप्रसाद याचे आयोजन करणार आहेत. ज्या ठिकाणी मुक्काम असेल त्या ठिकाणी रोज सायंकाळी सुंदर अशा वक्त्यांचे कीर्तनाच्या माध्यमातून सर्वांना मार्गदर्शन मिळणार आहे. एकादशी दिवशी आळंदी येथे  विश्वंभरबाबा अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व बाल वारकऱ्यांचा सुंदर असा भजनाचा कार्यक्रम, तसेच आळंदी दिंडी नगर प्रदक्षिणा, सायंकाळी प्रवचन,हरिपाठ, व ह भ प युवा कीर्तनकार दीपेश महाराज जाधव यांचे कीर्तन संपन्न होणार आहे.आणि रविवार दि. 16/ 11/ 2025 रोजी सकाळी 08 ते 10 या वेळेमध्ये दिंडी सोहळा प्रमुख ह भ प अतुल महाराज देशमुख गांजे यांचे काल्याचे किर्तन होणार होणार आहे त्यानंतर काल्याचा महाप्रसाद घेऊन पुन्हा परतीचा प्रवास सुरू होणार आहे अशी माहिती दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष,नारायण धनावडे, उपाध्यक्ष,दत्तात्रय खताळ बापू, सचिव,तुकारामजी देशमुख गांजे 

कार्याध्यक्ष, विठ्ठल सापते निझरे.खजिनदार - सौ अंजना भोसले,सचिन शेठ मगरे, विलास आबा पवार. व दिंडी सोहळ्यातील सर्व संचालक पदाधिकारी यांनी दिली.तसेच तालुक्यातीलच नव्हे तर सातारा जिल्ह्यातील सर्व भाविकांनी या नामयज्ञ दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आनंद घ्यावा तसेच

ज्या भाविक वारकर्यांना दिंडीमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी मो नं  8605596267/9423262033/7083736347 वरती त्वरित संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी  केले आहे

.

No comments:

Powered by Blogger.