Header Ads

कुपवाड एम आय डीसी पोलिसांची कौतुक स्पर्धा कामगिरी.*

 कुपवाड एम आय डीसी पोलिसांची कौतुक स्पर्धा कामगिरी.*

मिरज तालुका :-प्रतिनिधी राजु कदम

यशस्वी कारवाई करत तब्बल ८ हरवलेले वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन शोधून काढले. सुमारे १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. आपला हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.


सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे हद्दीतील हरवलेले मोबाईल शोधून ते नागरिकांना परत देण्याबाबत सूचना दिल्या होत्या. या सूचनांचे पालन करत, मिरज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली, एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. आनंदराव घाडगे यांनी एक विशेष पथक नेमले. या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल अमोल जाधव यांनी हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारच्या 'CEIR' पोर्टलचा प्रभावी वापर केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांनी या मोबाईल्सचा यशस्वीरित्या माग काढला. याकामी त्यांना पोलीस हेड कॉन्स्टेबल आप्पासो नरुटे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील यांनी मोलाची मदत केली. या पथकाने केलेल्या अथक प्रयत्नांमुळे वेगवेगळ्या कंपन्यांचे एकूण ८ मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश आले, ज्यांची एकूण किंमत १,३५,००० रुपये आहे.


ही संपूर्ण कामगिरी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलिसांनी हस्तगत केलेले सर्व ८ मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना बोलावून सन्मानपूर्वक परत केले. यामुळे तक्रारदारांनी एमआयडीसी कुपवाड पोलीस आणि संपूर्ण पोलीस दलाचे कौतुक केले आहे.

No comments:

Powered by Blogger.