जयसिंगपूर नगर परिषदेच्या प्रभाग क्र.8 मध्ये सौ. उज्ज्वला वाघवेकर यांची उमेदवारी विश्वासार्हतेचा भक्कम पाया
जयसिंगपूर नगर परिषदेच्या प्रभाग क्र.8 मध्ये सौ. उज्ज्वला वाघवेकर यांची उमेदवारी विश्वासार्हतेचा भक्कम पाया
जयसिंगपूर / प्रतिनिधी
जयसिंगपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 8 मधून राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवार सौ.उज्ज्वला उत्तम वाघवेकर यांना प्रभागातील मतदारांचा उत्स्फूर्त आणि वाढता प्रतिसाद मिळत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय राहून सातत्याने जनसेवा करणारे त्यांचे पती इंजिनियर उत्तम वाघवेकर यांनी विविध सामाजिक आणि शासकीय योजनांचे प्रभावीपणे जनजागरण केले असून, तळागाळातील नागरिकांशी संपर्कात राहून त्यांच्या अडचणी,सुख- दुःखात सहभागी होऊन काम केले आहे.उत्तम वाघवेकर यांची ही निस्वार्थ व प्रामाणिक कार्यशैलीच सौ.उज्ज्वला वाघवेकर यांच्या उमेदवारीसाठी विश्वासार्हतेचा भक्कम पाया ठरत असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे. प्रभागातील रस्ते,पाणी पुरवठा,स्वच्छता,कचरा व्यवस्थापन तसेच महिलांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांचा लाभ अधिकाधिक कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याबाबत उज्ज्वला वाघवेकर यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. घराघरात जाऊन नागरिकांच्या समस्या समजून घेणे,त्यासाठी योग्य मार्गदर्शन करणे आणि समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणे,अशी कार्यपद्धती प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात दिसून येत आहे.राजर्षी शाहू विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर व आघाडीचे प्रमुख नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांनी प्रभाग क्रमांक 8 साठी सौ.उज्ज्वला वाघवेकर यांच्यावर विश्वास टाकत नेतृत्वाची संधी दिल्यानंतर स्थानिकांमध्ये उत्सुकता वाढली असून,विविध समाजघटक, महिला बचतगट,युवक संघटना तसेच ज्येष्ठ नागरिकांकडूनही त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. प्रभागाचा सर्वांगीण विकास, सर्वसमावेशक नियोजन आणि पारदर्शक प्रशासन हे आपले प्रमुख ध्येय असल्याचे वाघवेकर यांनी मतदारांशी संवाद साधताना सांगितले.प्रभागातील नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी नाते जोडून काम करणाऱ्या या दाम्पत्याने दीर्घकाळ घेतलेल्या परिश्रमांची दखल अखेर राजकीय स्तरावर घेतली गेली असून, त्याचा परिपाक म्हणून सौ.वाघवेकर यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर समर्थकांचा उत्साह अधिक वाढला असून प्रभागातून त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे.

No comments: