Header Ads

श्री दत्त जयंतीनिमित्त सावर्डेत भव्य रक्तदान शिबीर श्री दत्त भजनी मंडळ सावर्डे यांचा पुढाकार.

 श्री दत्त जयंतीनिमित्त सावर्डेत भव्य रक्तदान शिबीर

श्री दत्त भजनी मंडळ सावर्डे यांचा पुढाकार.


बच्चे सावर्डे प्रतिनिधी - सुनिल पाटील

सावर्डे (ता. पन्हाळा) :

ह.भ.प. सद्गुरु तुकाराम महाराज डोणोलीकर व ह.भ.प. पू. सद्गुरु तुळशीदास महाराज ओतूरकर यांच्या कृपाशीर्वादाने येथील श्री दत्त मंदिर, सावर्डे येथे ४१ वा श्री दत्त पारायण सोहळा व श्री दत्त जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

रक्तदान शिबीर रविवार, दि. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत संपन्न होणार असून, आयोजक म्हणून श्री दत्त भजनी मंडळ, सावर्डे कार्यरत आहेत.

या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना व त्यांच्या कुटुंबियांना २४ तास रक्त उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक रक्तदात्यास डोनर कार्ड, प्रमाणपत्र व मोफत रक्तगट तपासणीची सुविधा देण्यात येणार आहे.

समाजामध्ये रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी व गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री दत्त भजनी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Powered by Blogger.