बेळगावमध्ये खळबळ! ‘काळा दिवस रॅली’पूर्वी खासदार धैर्यशील माने यांना पोलिसांनी केली अटक!
बेळगावमध्ये खळबळ! ‘काळा दिवस रॅली’पूर्वी खासदार धैर्यशील माने यांना पोलिसांनी केली अटक!
संस्कार कुंभार
कोल्हापूर / बेळगाव :
कोल्हापूर–बेळगाव सीमावाद पुन्हा भडकला आहे. १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ‘काळा दिवस रॅलीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली आहे. शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी खासदार धैर्यशील माने, विजय देवणे, संजय पवार यांच्यासह अनेक मराठी नेत्यांवर बेळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदीचे आदेश लागू केले आहेत.
मात्र, या निर्णयावर चर्चा करण्यासाठी खासदार धैर्यशील माने आज सकाळी बेळगावात दाखल झाले असता, बेळगाव पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक केली. या अचानक झालेल्या कारवाईमुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. कागल–बेळगाव महामार्गावर छावणीसदृश वातावरण निर्माण झालं असून पोलीस दल तैनात करण्यात आलं आहे.
वाहनांची कसून तपासणी सुरू असून, कोणतीही अनुशासनभंगाची घटना घडू नये यासाठी प्रशासन सतर्क आहे. बेळगाव व सीमाभागात सुरक्षेचे विशेष बंदोबस्त ठेवण्यात आले आहेत.
🎙️ बाईट – खासदार धैर्यशील माने :
“मराठी माणसांच्या हक्कांसाठी आणि अस्मितेसाठी आम्ही लढत आहोत. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार असतानाही प्रशासन लोकशाही दडपण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही मागे हटणार नाही!

No comments: