Header Ads

भरधाव टॅम्पोची दुचाकीला जोरदार धडक; ठिकपुर्लीतील ६१ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू.

 भरधाव टॅम्पोची दुचाकीला जोरदार धडक; ठिकपुर्लीतील ६१ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू.

----------------------------------

 राधानगरी प्रतिनिधी 

----------------------------------

राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली गावाजवळील कॅनॉल पुलावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका ६१ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ठिकपुर्ली (ता. राधानगरी) येथील तानाजी गणपती (दे) पाटील (वय ६१) हे आपल्या फॅशन प्रो दुचाकी (MH 09 BT 6229) वरून शेतातील काम आटोपून घरी परतत असताना हा अपघात झाला. त्याचवेळी गुड्स कॅरिअर टॅम्पो (MH 16 CA 0317) हा परीते दिशेने येत होता.


टॅम्पो चालक अंकुश सात्ताप्पा चौगुले (वय ३४, रा. माजगाव, ता. राधानगरी) याने वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून समोरून आलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत तानाजी पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीचेही मोठे नुकसान झाले.


या घटनेची फिर्याद चंद्रकांत श्रीपती पाटील (वय ४४, व्यवसाय शेती, रा. ठिकपुर्ली) यांनी राधानगरी पोलिस ठाण्यात दिली आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून राधानगरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 302/2023, बी.एन.एस. कलम 106(1), 281, 125(A), 125(B), 324(4)(5) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पो.हे.कॉ. 1611 पाटील यांनी गुन्हा नोंदविला आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी रस्त्यांवर सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Powered by Blogger.