हातकणंगलेत ३ लाखांहून अधिक किमतीचा अवैध दारूसाठा जप्त; एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.
हातकणंगलेत ३ लाखांहून अधिक किमतीचा अवैध दारूसाठा जप्त; एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.
------------------------------
शशिकांत कुंभार
------------------------------
हातकणंगले : हातकणंगले पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी मोठी कारवाई करत ३,०६,९३० रुपये किमतीचा अवैध दारूसाठा आणि वाहतुकीसाठी वापरलेली कार जप्त केली आहे. याप्रकरणी किरण श्रावण देवाई (वय २९, रा. कोरवी गल्ली, ता. हातकणंगले) या आरोपीविरुद्ध हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास हातकणंगले गावातील सांगली-कोल्हापूर रोडवरील निसर्ग बारसमोर ही कारवाई करण्यात आली. आरोपी किरण देवाई हा एका पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी अल्टो कारमध्ये (क्र. MH12 LV 8681) स्वतःच्या फायद्यासाठी महाराष्ट्र सरकारचा कर चुकवून विनापरवाना दारू विक्री करण्याकरिता बाळगून असताना मिळून आला.
फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल राहुल टोणपे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी गोवा बनावटीची ओल्ड मंक, रिअल चॉईस, अँपल वोडका आणि रिअल वोडका या कंपन्यांच्या एकूण ४६ बाटल्या जप्त केल्या, ज्यांची किंमत सुमारे ६,९३० रुपये आहे. यासोबतच, अवैध वाहतुकीसाठी वापरलेली ३,००,००० रुपये किमतीची मारुती अल्टो कारदेखील जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या संपूर्ण मालाची किंमत ३,०६,९३० रुपये आहे.
हातकणंगले पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल पटेकर या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

No comments: