गांधीनगर मधील आंबेडकर पुतळ्याची दुरवस्था कायम; अतिक्रमण जागा खाली करा.
गांधीनगर मधील आंबेडकर पुतळ्याची दुरवस्था कायम; अतिक्रमण जागा खाली करा.
गांधीनगर; प्रतिनिधी
गांधीनगर मधील बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील पुतळ्याच्या परिसरात भाजीपाला व फळ विक्रेते यांनी अतिक्रमण कायम आहे.अस्ताव्यस्त असलेल्या दुर्गंधीमुळे पुतळ्या भोवती दिवसेदिवस अतिक्रमण घट्ट होत आहे. येथील दुरावस्था तातडीने दूर करा. अशी मागणी
प्रबोधन संकल्प पंचक्रोशी सेवा संस्था गांधीनगर यांच्या वत्तीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदन प्रति सरपंच व ग्रामसेवक गांधीनगर ग्रामपंचायत यांना दिले आहे. तर
गांधीनगर मधील सिटी सर्वे नंबर २७/ ७३ मधील बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरामधील भाजीपाला व फळ विक्रेतेचे वाढले आहे. येथील अतिक्रमण काढून टाकण्याची मागणीचे पत्र ११ नोव्हेंबर २५ रोजी दिले आहे.
ग्रामपंचायतीने या विषयी गांभीर्याने घेतलेले नाही.त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती जिल्हाधिकारी यांना पुढील कारवाई साठी निवेदन देण्यात येणार आहे. तसे ग्रामपंचायतला स्मरण पत्रही दिले आहे.
येथे उग्र स्वरूपात आंदोलन झाल्यास
पुढील कोणताही अनुचित प्रकार घडल्यास ग्रामपंचायत व प्रशासन जबाबदार राहील असेही निवेदनात म्हटले आहे.या निवेदनावर बाळासो पवार, अविनाश राजपाल,
सतीश घाटगे, तानाजी इंगवले,नितीन कांबळे आदीच्या सह्या आहेत. तरी तातडीने हा प्रश्न मार्गी लागावा अशी मागणी पुन्हा जोर धरत आहे.
चौकट: प्रबोधन संकल्प पंचक्रोशी संस्था गांधीनगर या या सेवाभावी संस्थेच्या वत्तीने गांधीनगर मधील बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या प्रवेशद्वाराला कमान हवी व त्या कमानीस बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार असे नाव द्यावे

No comments: