राजस्थानी कामगारांचा विषबाधेने मृत्यू.मुरगुड येथील दुर्देवी घटना.
राजस्थानी कामगारांचा विषबाधेने मृत्यू.मुरगुड येथील दुर्देवी घटना.
-----------------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
-----------------------------------
हजारो किलोमीटर वरून पोटासाठी आलेल्या राजस्थानी कामगाराचा विषबाधेने दुर्दैवी अंत झाल्याची घटना मुरगुड शहरात रविवारी सकाळी घडली मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव विकास हिराराम गुर्जर वय 25 राहणार थोडा जिल्हा बिडवाना राजस्थान असे आहे. याबाबत समजलेली हकीकत अशी की मुरगूड येथील गाव भागामध्ये एका घरामध्ये हे सर्वजण कामगार राहतात तिथेच जेवण करून ते राहतात शुक्रवारी संध्याकाळी दाल भात आणि चपाती जेवण करून झोपी गेल्यानंतर शनिवारी सकाळी त्यांची तब्येत बिघडली यानंतर औषधोपचार करून हे सर्वजण कामावर गेले यानंतर त्यांना कोणताही त्रास झाला नाही मात्र पहाटेपासूनच विकासकुमार याला जास्त त्रास होऊ लागला तसेच इतर चार जणांना देखील त्रास होऊ लागल्याने सकाळी आठच्या सुमारास खाजगी दवाखान्यात उपचारासाठी गेले त्या ठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. यानंतर इतर तीन कामगारांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे तातडीने पाठवण्यात आले व एक कामगार बरा झाला त्याने दिलेल्या माहितीवरून मयत विकास कुमार याला रात्रीच जास्त त्रास होऊ लागला मात्र त्याचा सकाळी मृत्यू होईल असे त्यांना वाटले नव्हते यावेळी राजस्थानी कामगारांनी मोठी गर्दी केली होती शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह राजस्थान येथे पाठवण्यात आला पोटासाठी हजारो किलोमीटर दूरवर येऊन आपल्या आई-वडिलांची स्वप्न पूर्ण करणाऱ्या युवकाचा असा अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे याबाबत ची वर्षी त्याच्या सोबत राहणारे श्रवण गुर्जर यांनी दिली आहे पुढील तपास कॉन्स्टेबल देसाई आणि कुंभार मुरगुड पोलीस स्टेशन करत आहेत

No comments: