गवा रेड्याच्या हल्ल्यात युवक जखमी पोर्ले तर्फ बोरगाव येथील घटना.
गवा रेड्याच्या हल्ल्यात युवक जखमी पोर्ले तर्फ बोरगाव येथील घटना.
-------------------------------------
बाजार भोगाव प्रतिनिधी
सुदर्शन पाटील
-------------------------------------
पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ बोरगाव येथे वैरणीसाठी गेलेल्या संदीप दिनकर काटकर (वय ४०) या युवकावर गव्याने हल्ल्या केल्याने गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. बाजारभोगाव परिसरात पाच दिवसांत दुसरी घटना घडली असून भितीचे वातावरण आहे.
याबाबत अधिक माहिती अशी संदीप काटकर हे सकाळी वैरणीसाठी युवराज विठ्ठल काटकर यांच्या बारथळ नावाच्या शेतातील बांधावरील गाजर गवत कापण्यासाठी गेले होते. यावेळी ऊसात दबा धरून बसलेल्या गव्याने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात उजव्या बाजूला पोटात शिंग खुसल्याने पोटावर मोठी जखम झाली व डाव्या बाजूला बरकडी जवळ शिंग खुसले आहे. छातीस मार लागला असून बरगड्या मोडल्या आहेत तर या धडकेत त्याचे तीन दात पडले आहे.
जखमी अवस्थेतच संदीप काटकर रस्त्यावर आले यावेळी जवळच नांगरटीसाठी आलेले अमोल जाधव व सखाराम म्हेतर याना त्याच्या ओरडण्याचा आवाज आला. त्याला गावात आणला त्यावेळी बेशुद्ध झाला होतो तेथून नातेवाईकांनी तात्काळ बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले तेथे प्राथमिक उपचार करून कोल्हापूरला खासगी दवाखान्यात नेण्यात आले. त्याच्यावर दुपारी शस्त्रक्रिया करण्यात आली.
या घटनेची माहिती समजतात आमदार चंद्रदीप नरके यानी गव्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या संदीप काटकर याची भेट घेतली व वनविभागाने जखमीवर उपचार करण्यासाठी खर्च करावा अशा सूचना केली. तर पन्हाळा वनपरिक्षेत्र अधिकारी अजित माळी बाजारभोगाव वनपाल राजेद्र रसाळ, चेतन नरके. माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील अँड शाहू काटकर यानी भेट घेलली. सदर घटनेचा पंचनामा वनरक्षक मच्छिद्र नवाळी वनमजूर सर्जेराव काटकर भुजिगा पाटील यानी केला.
फोटोओळ संदीप काटकर

No comments: