भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा ग्रामीण पश्चिम सरचिटणीस म्हणून सुलोचना नार्वेकर यांची नियुक्ती.
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा ग्रामीण पश्चिम सरचिटणीस म्हणून सुलोचना नार्वेकर यांची नियुक्ती.
कोल्हापूर :
भारतीय जनता पार्टी, कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पश्चिम महिला मोर्चात कार्यरत असलेल्या सुलोचना लक्ष्मीकांत नार्वेकर यांची जिल्हा महिला मोर्चा ग्रामीण पश्चिम सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे ग्रामीण भागातील महिला कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही नियुक्ती भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मान. रवींद्रजी चव्हाण, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, भाजप महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली तर जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली.
दीर्घकाळापासून पक्ष संघटनात सक्रिय राहून तळागाळातील महिलांशी सातत्याने संपर्क ठेवणे, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये पुढाकार घेणे, पक्षाची भूमिका घराघरांत पोचवणे या माध्यमातून सुलोचना नार्वेकर यांनी भक्कम जनाधार निर्माण केला आहे. त्यांच्या कार्यतत्परतेची आणि संघटन कौशल्याची दखल घेऊन त्यांना ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
नियुक्तीनंतर आपल्या भावना व्यक्त करताना सुलोचना नार्वेकर म्हणाल्या की, _“पक्षाने माझ्यावर ठेवलेला विश्वास हे माझे खरे बळ आहे. ग्रामीण भागातील महिल

No comments: