शिवा संघटनेचे तालुकाध्यक्ष हनमंत लांडगे व काँग्रेसचे कोषाध्यक्ष शिवाजी आंबेकर यांचा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश* *भाजपाचे मा.नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांचा पुढाकार* *लोह्यात दिवसेंदिवस भाजपा बळकट* *
*शिवा संघटनेचे तालुकाध्यक्ष हनमंत लांडगे व काँग्रेसचे कोषाध्यक्ष शिवाजी आंबेकर यांचा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश*
*भाजपाचे मा.नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांचा पुढाकार*
*लोह्यात दिवसेंदिवस भाजपा बळकट.
लोहा प्रतिनिधी अंबादास पोवार
लोहा न.प.निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टी मध्ये इन्कमिंग मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून यात शिवा संघटनेचे लोहा तालुकाध्यक्ष हनमंत लांडगे व काँग्रेसचे लोहा तालुका कोषाध्यक्ष शिवाजी आंबेकर यांनी भाजपाचे जेष्ठ नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथे भारतीय जनता पार्टी मध्ये जाहिर प्रवेश केला आहे.
यामुळे लोह्यात भाजपा पक्ष दिवसेंदिवस अधिक बळकट होत आहे.
यापुर्वी शिवसेना शिंदे गटाचे लोहा -कंधार विधानसभा प्रमुख मिलिंद पाटील पवार यांनी भाजपा प्रवेश केला आहे.
भाजपाचे लोहा शहर मंडळ अध्यक्ष तथा मा.नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मा. नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पार्टी मध्ये इन्कमिंग मोठ्या प्रमाणात होत आहे.
दि.१५ नोव्हेंबर रोजी शिवा संघटनेचे लोहा तालुकाध्यक्ष हनमंत लांडगे व काँग्रेसचे लोहा तालुका कोषाध्यक्ष शिवाजी आंबेकर यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी हनमंत लांडगे व शिवाजी आंबेकर यांचा भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांचा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी स्वागत करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपाचे महानगराध्यक्ष माजी आमदार अमर राजूरकर, भाजपा लोहा मंडळ अध्यक्ष तथा मा. नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, माजी नगरसेवक युवराज वाघमारे, माजी नगरसेवक संदीप दमकोंडवार, माजी नगरसेवक नबी शेख, माजी नगरसेवक अमोल व्यवहारे,मिलिंद पाटील पवार,केशव पाटील पवार, बाळासाहेब कतुरे, आशिष व्यवहारे, लक्की फुलवरे , वैभव हाके आदी उपस्थित होते.

No comments: