Header Ads

बिरसा मुंडा यांचे कार्य व विचार वाडी-तांड्यापर्यंत पोहोचने ही काळाची गरज-गुणवंत एच.मिसलवाड

 बिरसा मुंडा यांचे कार्य व विचार वाडी-तांड्यापर्यंत

पोहोचने ही काळाची गरज-गुणवंत एच.मिसलवाड

------------------------------

नांदेड प्रतिनिधी 

 अंबादास पवार.

------------------------------

नांदेड  जल, जंगल, जमिन ही मूळ आदीवासी जमातींची विरासत असतांना 18 व्या शतकात ब्रिटीशांनी व फितूरी सावकारांनी आदिवासी अनुसूचित जमातीवर अन्याय केला याचा बदला म्हणून भगवान बिरसा मुंडा यांनी उलगूलान या आंदोलनाच्या माध्यमातून बंड पुकारून भारत देशातील तमाम आदिवासी जमातींना जमीन कास्त करण्यासाठी परत मिळवून देवून इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारा महान क्रांतीकारक म्हणजेच बिरसा मुंडा यांचे कार्य व विचार वाडी-तांड्यापर्यंतच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.गुणवंत एच.मिसलवाड यांनी केले.

ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि.15 नोव्हेंबर 2025 शनिवार रोजी सकाळी ठिक 10.30 वाजता आदिवासी समाज क्रांतीचे जनक, धरती आबा, क्रांतीसुर्य, थोर स्वातंत्र्य सेनानी, भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती आदिवासी गौरव दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.  या आयोजीत अभिवादन कार्यकम सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. सर्वप्रथम रापम आगाराचे सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक मा.श्री. विष्णू हारकळ यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

प्रमुख वक्ते म्हणून पुढे बोलताना आपल्या भाषणात ते म्हणाले की, आजच्या या आधुनिक काळात युवा पिढीने धरती आबा बिरसा मुंडा यांचा आदर्श घेऊन त्यांचा इतिहास व कार्य विचार आत्मसात करून समाजाप्रती-देशाप्रती कार्य केले पाहिजे, असेही ते शेवटी यावेळी म्हणाले.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक विष्णू हारकळ, पाळी प्रमुख कैलास वाघमारे, संजय खेडकर, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड, वरिष्ठ लिपीक सुरेश फुलारी, नितीन मांजरमकर, आनंद कोटगीरे, सौ.वैशाली कोकणे, श्वेता तेलेवार, सुनिता हुंबे, यांत्रीक शेख अलीमोद्दीन, कृष्णा पवार, संजय मंगनाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास रापम आगारातील कष्टकरी कामगार-कर्मचारी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.