मुरगुड नगरपालिकेचे अध्यक्ष पद सर्वसाधारण महिलासाठी खुले... नगराध्यक्ष महिला कशी असावी मुरगुडकरांच्या अपेक्षा वाढल्या
मुरगुड नगरपालिकेचे अध्यक्ष पद सर्वसाधारण महिलासाठी खुले... नगराध्यक्ष महिला कशी असावी मुरगुडकरांच्या अपेक्षा वाढल्या.
मुरगूड/ जोतीराम कुंभार
नगर परिषदा, नगरपालिका यांच्या निवडणुकाची रणधुमाळी नुकतीच सुरू झाली आहे राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या मुरगुड नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला वर्गासाठी असल्याने उमेदवार कसा असावा याची जोरदार चर्चा मुरगुड शहरात जनतेतून सुरू आहे लोकांच्या अपेक्षा वाढल्या असून सर्व थरातून नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत अनेक जण भूमिका व्यक्त करत आहेत ज्या नगर पालिकेच्या केंद्रा भोवती कागल तालुक्याचे राजकारण फिरते ती मुरगूड नगरपालिका स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांची जन्मभूमी असल्याने हे गाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात परिचित आहे यापूर्वी निवडणुका झाल्या अनेकांनी कारभार केला अनेक सत्ता उपभोगल्या पण आत्तापर्यंत विकासात्मक व्हिजन घेऊन कार्य झालेली दिसत नाहीत आता मात्र सर्वसामान्य जनतेबरोबर अनेकांच्या मुरगूड शहराबाबत अपेक्षा निश्चितच वाढलेल्या आहेत कुठल्या पक्षाचा नगराध्यक्ष असावा यापेक्षा तो किती सुशिक्षित, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, सर्वसामान्य जनतेच्या हित साधणाऱ्या भूमिकेशी असणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे मुरगुड मध्ये सध्या अनेक दिग्गज पक्षाचे दिग्गज राजकारणी कार्यरत आहेत पण जनतेच्या अपेक्षा म्हणाव्या अशा पूर्ण झालेल्या नाहीत म्हणून या शहरातून व्यापारी, तरुण, महिला वर्गा बरोबर सर्वसामान्य जनतेतून आगामी निवडणुकीतून निवडून येणारी महिला अध्यक्ष कशी असावी याबाबत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भूमिका व्यक्त होत आहेत या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा आणि एक आदर्श नगरपालिका म्हणून राज्यात नाव लौकिक व्हावा अशा भूमिकेची नगराध्यक्ष असावी अशी भूमिका असणे हे चुकीचे ठरणार नाही यासाठी या नगरपालिकेचा अध्यक्ष हा विद्या विभूषित असावा, शहराच्या सर्वांगीण विकासाचे कल्पक व्हिजन असणारा असावा, विकासात्मक भूमिका घेऊन सर्वसामान्य जनतेला विश्वास देऊन कार्य करणारा असावा, विकासात्मक कामे राबवत असताना निपक्षपाती भूमिका घेणारा असावा, विकास कामांना निधी खेचून आणताना भ्रष्टाचारी नसावा त्याचबरोबर स्वतः चे कर्तुत्व कौशल्य पणाला लावणारा स्वतः निर्णय क्षमता असलेला असा असावा त्याचबरोबर नगरपालिकेचे अध्यक्ष पद महिला असल्याने संबंधित महिला अध्यक्षा ऐवजी पतीचा हस्तक्षेप नसावा सर्वांगीण विकास करत असताना थोडीशी राजकीय पार्श्वभूमी विविध विभागातील विकास योजनांची परिपूर्ण माहिती आणि सर्वांना न्याय देण्याची भूमिका घेणारा असावा संबंधित अध्यक्ष व्यक्तीला कायदा सुव्यवस्था नियम यांची जाणीव आणि परिपूर्ण माहिती असणारी असावा. सहकार, शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक, क्रीडा, सांस्कृतिक आदी विभागातील योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी या सर्व क्षेत्रातील परिपूर्ण अभ्यास असणारी अध्यक्ष पदाची व्यक्ती असावी अशी भूमिका मुरगुड शहरातील सर्वच घटकातून व्यक्त होत आहे .

No comments: