भडगांव-कोल्हापूर एस.टी. बस सेवा सुरु. प्रवाशांच्या मागणीनुसार जादा फेऱ्या मंजूर करणार. - समरजित मंडलिक
भडगांव-कोल्हापूर एस.टी. बस सेवा सुरु.प्रवाशांच्या मागणीनुसार जादा फेऱ्या मंजूर करणार.- समरजित मंडल
मुरगूड/ जोतीराम कुंभार
माजी खासदार संजय मंडलिक यांच्या विशेष प्रयत्नामुळे मंजूर करणेत आलेल्या भडगांव-कोल्हापूर व बिद्री मार्गावरील एस.टी. सेवेचा शुभारंभ युवा नेते समरजित संजय मंडलिक यांच्या शुभहस्ते भडगांव येथे संपन्न झाला. प्रवासी व विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आणखी या मार्गावर जादा फेऱ्या मंजूर करणार असल्याची ग्वाही समरजित मंडलिक यांनी यावेळी दिली.
कोरोना कालावधीपासून या मार्गावर बस सेवा बंद होती. चार वर्षानंतर माजी खासदार मंडालक यांच्या विशेष प्रयत्नातून या मार्गावर पुन्हा बससेवा सुरु झाल्याने परिसरातील विद्यार्थी व प्रवाशी जनतेची मोठी सोय झाली आहे. याशिवाय बिद्री साखर कारखान्याकडील कामगार वर्ग व शेतकरी सभासदांचीही सोय झाली आहे. बिद्रीकडे जाणा-या सर्व बसेस भडगांव मार्गे मंजूर झालेने प्रवाशी व विद्यार्थी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
यावेळी दत्तात्रय सोनाळकर, दिलीप चौगले, सुनिल भांडवले, वर्षा बाजीराव पाटील, ज्ञानदेव पाटील, मधूकर सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी चालक व वाहक यांचा सत्कार करणेत आला. स्वागत व प्रास्ताविक सरपंच बी. एम. पाटील यांनी केले.आभार विठ्ठल खतकर यांनी मानले.
या मार्गावरील बस वेळापत्रक असे -
कागल-बिद्री मार्ग (आप्पाचीवाडी-म्हाकवे-मळगे-भडगांव-सोनाळी -बिद्री)
सकाळी १०.४० व दु. २.३०.
2. बिद्री-कागल दुपारी १२.२० व ४.१० वा. सोनाळी-भडगांव-मळगे-म्हागवे-आप्पाचीवाडी)
3. कागल-भडगांव (मुक्काम) रात्री ७.४५ (मार्गे-आप्पाचीवाडी-म्हाकवे-मळगे)
4. भडगांव-रंकाळा सकाळी ७.३० वा. (मार्गे मळगे-म्हाकवे-आप्पाचीवाडी-कागल-राजारामपुरी)

No comments: