सांगली जेल मधून पळालेल्या कैद्याला उदगाव बस स्थानकातून केले जेरबंद मिरज व जयसिंगपूर पोलिसांची कारवाई.
सांगली जेल मधून पळालेल्या कैद्याला उदगाव बस स्थानकातून केले जेरबंद मिरज व जयसिंगपूर पोलिसांची कारवाई.
-----------------------------------
जयसिंगपूर / प्रतिनिधी
-----------------------------------
सांगली जेलमध्ये खुनाच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असलेला अजय दाविद भोसले वय ३५ वर्षे रा. संजय गांधी झोपडपट्टी तासगाव वेस मिरज हा सांगली जेलच्या तटावरून खंदकात उडी मारून पळून गेला होता. या घटनेबाबत सांगली पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता आरोपीचा शोध घेण्यासाठी सांगली, मिरज पोलिसांना आदेश देण्यात आले होते मिरज पोलिसांना सोमवारी सकाळी आरोपी उदगाव बस स्थानक या ठिकाणी असल्याचे कळाल्यानंतर या ठिकाणी मिरज पोलीस ठाण्याचे दीपक परीट यांनी येऊन जयसिंगपूर पोलिसांच्या मदतीने आरोपी भोसले याला ताब्यात घेतले .
सांगली जेल मध्ये खुणाच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असलेला अजय दाविद भोसले राहणार मिरज हा 13 नोव्हेंबर रोजी सांगली जेलच्या तटावरून खंदकात उडी मारून पळून गेला होता. सांगली व मिरज पोलीस भोसले यांच्या मागावर होते. आरोपी भोसले हा पोलिसांना चकवा देत फरार होता मिरज गुन्हे प्रकटीकरण पथकास शोधण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते सोमवारी मिरज पोलीसांना आरोपी भोसले हा उदगाव बस स्थानक या ठिकाणी असल्याचे माहिती मिळाली त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि अण्णासाहेब गोदकर यांनी पो. शि. दीपक परीट यांना या ठिकाणी जाण्यास सांगितले दीपक परीट यांनी या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता आरोपी अजय भोसले हा बस स्थानकावर मिळून आला दीपक परीट यांना पाहून आरोपी भोसले हा पळून जाण्याच्या तयारीत होता दीपक परीट यांनी आरोपी भोसले यांना शिताफीने ताब्यात घेतले मिरज पोलीस ठाण्याचे पथक येईपर्यंत परीट यांनी जयसिंगपूर पोलिसांना कळवले तात्काळ जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण माने, पोलीस हवालदार निलेश मांजरे, पोलीस शिपाई अवघडे यांच्या मदतीने आरोपी भोसले यांना मिरज पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आरोपी भोसले याची वैद्यकीय तपासणी करून सांगली पोलीस ठाण्याकडे ताब्यात देण्यात आले आहे.

No comments: