रत्नागिरी वाहतूक शाखेला स्पीड गन कार – रस्ते अपघात नियंत्रणाचा धडाका!
रत्नागिरी वाहतूक शाखेला स्पीड गन कार – रस्ते अपघात नियंत्रणाचा धडाका!
रत्नागिरी, दि. 15 नोव्हेंबर 2025 : रत्नागिरी जिल्ह्यातील वाहतूक शाखेला वेगमर्यादा उल्लंघनावर प्रभावी नियंत्रणासाठी अत्याधुनिक स्पीड गन कार महाराष्ट्र शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आली. या वाहनाचा लोकार्पण सोहळा रत्नागिरी पोलीस मुख्यालयात उत्साहात पार पडला.
या स्पीड गन कारचे लोकार्पण मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीमती राधिका फडके (गृह), पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. निलेश माईनकर, पोलीस अधिकारी तसेच वाहतूक शाखेचे अंमलदार उपस्थित होते.
या स्पीड गन कारच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील महामार्ग व शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर वाहनांचा वेग नियंत्रित ठेवणे, वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनचालकांवर तत्काळ कारवाई करणे आणि वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालणे, असा उद्देश पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नवीन तंत्रसुसज्ज स्पीड गन कार कार्यान्वित झाल्याने, रस्ते सुरक्षा उपाययोजनांना अधिक बळ मिळणार असून नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन या वेळी पोलिसांकडून करण्यात आले.

No comments: