निमसाखर परिसरात थंडीचा जोर वाढला; नागरिकांनी उबदार कपड्यांचा वापर वाढवला.
निमसाखर परिसरात थंडीचा जोर वाढला; नागरिकांनी उबदार कपड्यांचा वापर वाढवला.
निमसाखर (ता. इंदापूर प्रतिनिधी गणेशराव धनवडे) : गेल्या काही दिवसांपासून तापमानात झालेल्या घटेमुळे निमसाखर परिसरात थंडीचा जोर वाढला आहे. पहाटे आणि रात्रीच्या वेळी गार वारे वाहत असून वातावरणात गारवा पसरला आहे. त्यामुळे नागरिकांनी उबदार कपडे, स्वेटर, मफलर आणि ब्लँकेट्सचा वापर सुरू केला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस तापमान आणखी खाली जाण्याची शक्यता असून सकाळच्या वेळेत दवबिंदू पडत आहेत. शेतात काम करणारे शेतकरी व सकाळी शाळेला जाणारी मुले थंडीमुळे त्रस्त झालेली दिसत आहेत.
थंडी वाढल्याने चहा आणि गरम पदार्थांच्या दुकानांवर गर्दी वाढली आहे. आरोग्य तज्ज्ञांनी सर्दी, खोकला आणि ताप यासारख्या आजारांपासून बचावासाठी योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः लहान मुले आणि वृद्धांनी थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments: