*कर्तव्यदक्ष पोलिसांचे कौतुक: हरवलेली गाडी शोधून मालकांच्या ताब्यात सुपूर्त* .
*कर्तव्यदक्ष पोलिसांचे कौतुक: हरवलेली गाडी शोधून मालकांच्या ताब्यात सुपूर्त* .
-------------------------------
संस्कार कुंभार
-------------------------------
तावडे हॉटेल परिसरात
पोलिसांनी पुन्हा एकदा कर्तव्यनिष्ठेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून शोधत असलेली एक्सेस मोपेड (क्रमांक MH-10 DH 3811) शोधून ती मूळ मालकांच्या ताब्यात सुरक्षितरित्या सुपूर्त करण्यात आली. या घटनेमुळे संबंधित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून पोलिसांच्या तत्पर कृतीचे संतत कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उक्त मोपेड हरवल्याची तक्रार सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली होती. आज शुक्रवारी तावडे हॉटेल परिसरात नियमित कर्तव्यावर असताना शहर वाहतूक शाखेचे पोलिस हवालदार नंदकिशोर नवनाथ कुंभार आणि होमगार्ड इमरान पेंढारी यांना ही मोपेड सोडून दिलेल्या अवस्थेत आढळून आली. वाहनावरील व वाहनातील कागदपत्रांची खातरजमा करुन पोलिसांनी मूळ मालकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून त्यांना त्वरित बोलावले आणि वाहन त्यांच्या ताब्यात दिले.
या संपूर्ण कार्यवाहीचे मार्गदर्शन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केले.
गाडी परत मिळाल्याने संबंधित कुटुंबीयांनी आनंद व्यक्त करत पोलिस हवालदार नंदकिशोर नवनाथ कुंभार, इमरान पेंढारी यांचे मनापासून आभार मानले. त्यांच्या दक्षतेचे स्थानिक पातळीवरही भरभरून कौतुक होत आहे. सदर घटनेमुळे पोलिस दलाबद्दल नागरिकांच्या मनात विश्वास आणि कृतज्ञतेची भावना अधिक दृढ झाली आहे
.

No comments: