Header Ads

जयसिंगपूर उबाठाचे शहराध्यक्ष तेजस कुराडे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह यड्रावकर गटात प्रवेश

जयसिंगपूर उबाठाचे शहराध्यक्ष तेजस कुराडे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह यड्रावकर गटात प्रवेश .

-----------------------------------------

जयसिंगपूर : नामदेव भोसले.

------------------------------------------

उध्दव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे जयसिंगपूर शहराध्यक्ष तेजस कुराडे यांनी शुक्रवारी शेकडो कार्यकर्त्यांसह यड्रावकर गटात जाहीर प्रवेश केला. 

या प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तेजस कुराडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.


  या प्रवेशामुळे यड्रावकर गटाला शहरात ताकद प्राप्त झाली असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

तेजस कुराडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील अनेक तरुण कार्यकर्ते सक्रिय झाले होते. गेल्या काही वर्षांत शहरातील विविध जनसंपर्क, सामाजिक उपक्रम, युवकांच्या समस्या, तसेच स्थानिक विकासाबाबत त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची मोठी फळी असून, या कार्यकर्त्यांनी एकदिलाने यड्रावकर गटात प्रवेश केल्याने या गटाची बाजू मजबूत झाली आहे.

 कार्यकर्त्यांनी या गटाच्या विकासाभिमुख धोरणांवर आणि नेतृत्वक्षमता यावर ठाम विश्वास व्यक्त करत भविष्यात अधिक मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढवून यड्रावकर गटाला मजबूत करण्याचा संकल्प केला. पुढे बोलताना कुराडे म्हणाले, जयसिंगपूर शहराचा सर्वांगीण विकास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व त्यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर  यांनी मोठ्या प्रमाणात केला आहे. हा विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी आम्ही शेकडो कार्यकर्त्यांसह यड्रावकर गटात सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. 

या प्रसंगी तेजस कुराडे यांच्यासह राहुल कुराडे, गणेशराज तावडे, यश साखळे, श्रेयश वळिवडे, योगेश पडवळ, सलीम मुल्ला, सुशील घोडके, आकाश जाधव,  प्रसाद माळी, प्रथमेश माळी, अभि माळी, पवन खांबले, अभिजीत व्हराटे, अभिजीत कुंभोजे, नवनीत व्हराटे

यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.