ऑन लाईन पार्सल मागवून ते पार्सल द्यायला आलेल्या कुरियर बॉयकडूनच चोरी करून पळून गेलेल्या चोरट्यास मोटारसायकल सह पोलिसांनी ताब्यात घेतले.
ऑन लाईन पार्सल मागवून ते पार्सल द्यायला आलेल्या कुरियर बॉयकडूनच चोरी करून पळून गेलेल्या चोरट्यास मोटारसायकल सह पोलिसांनी ताब्यात घेतले.
----------------------------
सातारा प्रतिनिधी.
अमर इंदलकर
-----------------------------
– सातारा शहर डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई; चोरी केलेले पार्सल व मोटारसायकल जप्त
ऑनलाईन पार्सल मागवून ते आल्यानंतर कुरीयर बॉयकडील पार्सल हिसकावून पळ काढणारा चोरटा सातारा शहर डी.बी. पथकाने विजेच्या वेगाने शोधून काढत ताब्यात घेतला आहे. या कारवाईत आरोपीकडून चोरी गेलेले पार्सल व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
घटनेचा थरार
दि. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सुमारे ३ हजार रुपये किंमतीचे कपड्यांचे ऑनलाईन पार्सल एका कुरीयर कंपनीमार्फत दिलेल्या पत्त्यावर पोहोचविण्यासाठी कुरीयर बॉय सातारा शहरातील ठिकाणी गेला. पत्त्याच्या आसपास पोहोचताच त्याने कंपनीच्या नोंदवहीतील नंबरवर पार्सल मागवणाऱ्या व्यक्तीस फोन करून,
“मी तुमच्या पत्त्याजवळ आलो आहे, पुढील रास्ता सांगा,” असे सांगितले.
त्यावर पार्सल मागवणाऱ्या व्यक्तीने, “मी पुण्यात आहे, पार्सल घेण्यासाठी माझा मित्र येईल,” असे सांगितले. काही वेळातच हुडी घातलेला, चेहरा स्पष्ट दिसणार नाही असा एक युवक मोटारसायकलवर त्या ठिकाणी आला. कुरीयर बॉय बिलाचे व पार्सलचे संभाषण करत असताना त्या युवकाने गाडीवर ठेवलेले पार्सल क्षणात हिसकावून मोटारसायकलसह पळ काढला.
कुरीयर बॉयने तातडीने पार्सल मागवणाऱ्या नंबरवर फोन करून घटनेची माहिती दिली. त्यावर, “मी कोणत्याही मित्राला पार्सल आणायला पाठवलेले नाही,” असा स्पष्ट नकार समोर आला. तेव्हा ही सरळसरळ चोरी असल्याचे लक्षात येताच कुरीयर बॉयने सातारा शहर पोलीस ठाण्यात हजेरी लावून फिर्याद दाखल केली. गरीब कुटुंबातील, साध्या मजुरीवर काम करणारा हा कुरीयर बॉय कंपनीची भरपाई करावी लागेल किंवा नोकरी जाईल या भीतीने अक्षरशः रडत रडत तक्रार नोंदवत होता.
“तू काळजी करू नकोस, चोर आम्ही शोधून काढू!” – पोलिसांचा दिलासा
कुरीयर बॉयची परिस्थिती पाहून सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के व अन्य पोलिस अंमलदारांनी त्याला धीर देत,
“सदर चोरी करणाऱ्या इसमास आम्ही पकडून तुझे पार्सल परत मिळवून देतो,” असे आश्वासन दिले आणि लगेचच प्रत्यक्ष सापळा रचण्यास सुरुवात केली.
डी.बी. पथकाची गुप्त शोधमोहीम
मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मस्के यांनी तात्काळ सातारा शहर डी.बी. पथकास आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार डी.बी. पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली, आसपासचे हालचाली, संशयितांचा अंदाज घेतला आणि हुडी घातलेल्या युवकाबद्दल गोपनीय माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, मिळालेल्या सुरागांवरून तो युवक मूळ चिंचणेर निंब, ता. व जि. सातारा येथील रहिवाशी आहे हे समजले प्रत्यक्ष त्या गावी चौकशी केली असता सदर व्यक्ती हा साताऱ्यातच कुठेतरी राहतो हे समजले, तसेच तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे हे समजले, सदर व्यक्तीचा काही गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेतला असता तो एम आय डी सी सातारा येथे काही टवाळखोर मुलांमध्ये बसायला असतो हे समजले पैकी काही संशयिताना ताब्यात घेऊन त्यांची अधिक चौकशी करून सदर व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतले त्याची चौकशी करीत असताना तो वाचण्याच्या प्रयत्नात ते पार्सल मी मागवलेच न्हवते माझा नंबरचा कोणी दुसर्यानेच दुरुपयोग केला आहे असे सांगत होता. पण पोलिसांनी कसोशीने चौकशी केली असता त्याने सदर पार्सल मीच चोरी केले असल्याचे सांगितले अजिंक्य बाबासाहेब डांगे राहणार मुळ गाव चिंचणेर निंब सध्या राहणार - निशिगंधा कॉलनी समर्थनगर सातारा.असे आरिपीचे नाव असून सदर कारवाईपोलीस अधिक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागिय अधिकारी सातारा विभाग सातारा राजीव नवले, वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो.हवा. श्रीनिवास देशमुख, राहूल घाडगे, सुजीत भोसले, निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रविण कडव, पो.ना. पंकज मोहिते, पो.कॉ. तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, आशिकेष डोळस, वैभव माने, सुशांत कदम, सुहास कदम

No comments: