Header Ads

अफूचा साठा करणारे दोघे जेरबंद; 09 किलो 587 ग्रॅम अफूसह 1.76 लाखांचा मुद्देमाल जप्त.

 अफूचा साठा करणारे दोघे जेरबंद; 09 किलो 587 ग्रॅम अफूसह 1.76 लाखांचा मुद्देमाल जप्त.

----------------------------------

हातकणंगले प्रतिनिधी

 नामदेव भोसले

----------------------------------

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची धडाकेबाज कारवाई

अवैध अंमली पदार्थांच्या साठ्यावर कठोर कारवाईचे आदेश मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेशकुमार साव यांनी दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अंबप फाट्याजवळ धाड टाकत दोन इसमांना अफूसह अटक केली. या कारवाईत तब्बल 09 किलो 587 ग्रॅम अफू व इतर साहित्य असा एकूण 1,76,305 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अवैध अंमली पदार्थांचा साठा व विक्री करणाऱ्या टोळ्यांचा समूळ नायनाट करण्याच्या निर्देशांनुसार पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी वेगवेगळी पथके तयार केली होती. यापैकी सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाला पोलीस अंमलदार प्रविण पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, अंबप फाट्याजवळ दोन इसम अफूची विक्री करत आहेत.

माहितीची शहानिशा करून 1 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3.20 वाजता पथकाने अंबप फाटा, राजमाता जिजाऊनगर, गल्ली क्रमांक 1 येथील एका आरसीसी इमारतीवरील खोलीवर छापा टाकला. छाप्यात दोघांना ताब्यात घेण्यात आले

सुरेश हैतराम बेनिवाल (वय 27), रा. राजस्थान–धाबा, अंबप फाटा

 धनराज शिवलाल मेघवाल (वय 25), रा. पेठवडगाव, मूळ गाव लोलावास, जि. जोधपूर

तपासादरम्यान त्यांच्या खोलीतून मोठ्या प्रमाणात अफू आढळून आला. पंचनामा करून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपींवर एनडीपीएस कायद्यानुसार वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी अफू कोणाकडून आणला, याचा पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेशकुमार व मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धिरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महादेव कुहाडे, अनिल जाधव तसेच पोलीस अंमलदार प्रविण पाटील, विनोद कांबळे, संदीप पाटील, अरविंद पाटील, अशोक पोवार, संजय पडवळ व राजेश राठोड यांनी सहभाग घेतला.

No comments:

Powered by Blogger.