जीवनात खेळाचे महत्व समजून घ्यावे : डॉ. उदयकुमार शिंदे कर्मवीर हिरे महाविद्यालयात क्रीडा महोत्सव सुरु
जीवनात खेळाचे महत्व समजून घ्यावे : डॉ. उदयकुमार शिंदे कर्मवीर हिरे महाविद्यालयात क्रीडा महोत्सव सुरु.
स्वरूपा खतकर.
----------------------
विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात खेळाचे महत्व समजून घ्यावे. सदृढ शरीर व करिअरच्या दृष्टीने खेळाकडे पहावे आणि यात सहभागी व्हावे. अनेक प्रसंगाना सामोरे जाण्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी खिलाडूवृत्ती जोपासावी, असे आवाहन प्राचार्य डॉ. उदयकुमार शिंदे यांनी केले.
येथील कर्मवीर हिरे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सव उद्धघाटनप्रसंगी ते बोलत होते. उप प्राचार्य डॉ. एस. जे. जितकर, पर्यवेक्षक प्रा. एस. एस. पाटील प्रमुख उपस्थित होते. कब्बडी स्पर्धेने महोत्सवाची सुरुवात झाली. यात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पहिल्या दिवशी सांघिक व वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या.
क्रीडा शिक्षण संचालक प्रा. सचिन चौगले, प्रा. ए. बी. पाटील, प्रा. आर. डी. देसाई, प्रा. डी. जे. आरडे, वर्गशिक्षक एस. बी. केणे, प्रा. ए. पी. वारके, प्रा. ए. आर. मांडरे, प्रा. एस. सी. इंगवले, प्रा. डी. एस. कोतमिरे, प्रा. डी. एन. जाधव, प्रा. एस. एस. वर्णे, प्रा. व्ही. एस. शिवशरण, प्रा. आर. जे. देसाई, प्रा. एस. एन. देसाई, प्रा. एन. एन. चौगले, प्रा. ए. व्ही. पाटील, प्रा. एस. एस. बनसोडे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. प्रा. प्रज्ञा बरकाळे यांनी आभार मानले.
फोटो :
गारगोटी : कर्मवीर हिरे कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडा महोत्सवप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. उदयकुमार शिंदे. समवेत सर्व प्राध्यापक.

No comments: