मेढा नगरपंचायत निवडणूक निकाल जाहीर; नगराध्यक्षपदी भाजपाच्या रुपाली वारागडे यांचा ४६ मतांनी थरारक विजय
मेढा नगरपंचायत निवडणूक निकाल जाहीर; नगराध्यक्षपदी भाजपाच्या रुपाली वारागडे यांचा ४६ मतांनी थरारक विजय
----------------------------------
मेढा प्रतिनिधी
शेखर जाधव
----------------------------------
सातारा/जावली :-- मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या रुपाली संतोष वारागडे यांनी केवळ ४६ मतांच्या फरकाने विजय मिळवत नगराध्यक्षपदावर आपली मोहोर उमटवली. वारागडे यांना १६१६ मते, तर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) व आघाडीच्या उमेदवार रेश्मा सचिन करंजेकर यांना १५७० मते मिळाली. अपक्ष उमेदवार शुभांगी गोरे यांना १७७ मते मिळाली.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत अखेर भाजपाच्या वारागडे यांनी बाजी मारली. निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
नगरसेवक पदाचे निकाल
मेढा नगरपंचायत निवडणुकीत विविध प्रभागांतून भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी व अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
प्रभाग १ (अनु.जा. पुरुष) : सुशांत संपत कांबळे (भाजप) विजयी
प्रभाग २ (अनु.जा. महिला) : सुनिता मालोजी तांबे (भाजप) विजयी
प्रभाग ३ (अनु.जा. महिला) : पुष्पा संतोष मुकणे (भाजप) विजयी
प्रभाग ४ (ओपन महिला) : छकुली रावसाहेब देशमुख – बिनविरोध (भाजप)
प्रभाग ५ (ओपन महिला) : आनंदी यशवंत करंजेकर – बिनविरोध (भाजप)
प्रभाग ६ (ना.मा.प्र. महिला) : सोनाली नितीन पवार (शिवसेना शिंदे) विजयी
प्रभाग ७ (ओपन पुरुष) : पांडुरंग दामोदर देशपांडे (भाजप) विजयी
प्रभाग ८ (ओपन महिला) : प्राजक्ता सुरेश पार्टे (राष्ट्रवादी श.प.) विजयी
प्रभाग ९ (ओपन पुरुष) : बापूराव एकनाथ जवळ (शिवसेना) विजयी
प्रभाग १० : हरिश्चंद्र तीवाटणे (भाजप) विजयी
प्रभाग ११ : नितीन बाबासाहेब मगरे (भाजप) विजयी
प्रभाग १२ : शिवाजी मारुती गोरे (भाजप) विजयी
प्रभाग १३ : रणधीर महादेव गोरे (शिवसेना) विजयी
प्रभाग १४ : तेजस्वी सागर इगावे (भाजप) विजयी
प्रभाग १५ : मोनिका प्रमोद जवळ (शिवसेना) विजयी
प्रभाग १६ : शर्वरी जयराज गायकवाड (शिवसेना) विजयी
प्रभाग १७ : शिवाजी महादू देशमुख (भाजप) विजयी
राजकीय चित्र
या निवडणुकीत भाजपाने नगराध्यक्ष पदासह अनेक प्रभागांत वर्चस्व सिद्ध केले असून काही प्रभागांत शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादीनेही आपली ताकद दाखवून दिली आहे. बिनविरोध निवडींमुळे भाजपाची स्थिती अधिक मजबूत झाली आहे.

No comments: