अल्फाबेटस इंग्लिश मीडियम स्कूल ची पोस्ट ऑफिसला शैक्षणिक भेट.
अल्फाबेटस इंग्लिश मीडियम स्कूल ची पोस्ट ऑफिसला शैक्षणिक भेट.
कोल्हापूर प्रतिनिधी विजय बकरे.
-----------------------------------
कोल्हापूर येथील शिवाजी पेठेतील अल्फा बेटस इंग्लिश मीडियम स्कूल ब्रह्मेश्वर बागचे विद्यार्थी यांनी कोल्हापूर सिटी एच ओ पोस्ट ऑफिसला भेट दिली
यावेळी कोल्हापूर सिटी एच ओ ऑफिस मधील ट्रेझरर सौ रीना पाटील यांनी पोस्ट ऑफिस मधील कामकाजाची व पत्र व्यवहाराची माहित तसेच माय स्टॅम्प व तीनशे रुपये मध्ये आपल्या फोटोसह तिकीट छपाई होणार असल्याचे सांगितले सदर तिकीट आपण पत्र व्यवहारासाठी वापरू शकतो पी पी एफ व सुकन्या समृद्धी योजना अधिक व्याजासह शैक्षणिक व लग्न खर्चाची तरतूद करता येते या अतिशय लाभार्थी योजनेची माहिती सांगण्यात आली तसेच पत्र लिहिण्यापासून ते पोहोचवण्यापर्यंत प्रवासाची माहिती देण्यात आली आपल्या पोस्ट ऑफिस चा पिनकोड नंबर महत्त्वाचा असतो असे मुलांना सांगितले
यावेळी कोल्हापूर सिटी एच ओ पोस्ट ऑफिस चे पोस्टमास्टर संजय पताडे देवेंद्र कवडे सौ रीना पाटील अल्फाबेटस इंग्लिश मीडियम स्कूल चे शिक्षक स्टॉप व विद्यार्थी हजर होते

No comments: