Header Ads

बामणोलीत मोबाईल टॉवरचे नाहरकत प्रमाणपत्र केले रद्द

 बामणोलीत मोबाईल टॉवरचे  नाहरकत प्रमाणपत्र केले रद्द

-----------------------------

मिरज तालुका प्रतिनिधी राजू कदम .

------------------------------


 कुपवाड : बामणोली (ता.

मिरज) गावातील दोन ठिकाणी सुरू असलेले मोबाईल टॉवर उभारणीस ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. काल मंगळवारी दि. २३ दुपारी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाने मोर्चाला दाद देत नरमाईची भूमिका घेतली. मोबाईल टॉवरसाठी जागा मालकास दिलेले नाहरकत प्रमाणपत्र यावेळी रद्द करण्यात आले.


घटनास्थळावरून


मिळालेल्या माहितीनुसार, बामणोली गावातील प्रभाग क्रमांक एक व दोनच्या परिसरात ग्रामस्थांच्या मालकीच्या जागेवर एका खासगी कंपनीकडून मोबाईल टॉवरचे काम सुरू होते. यासाठी काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीने दोन्ही ठिकाणच्या जागा मालकांना नाहरकत प्रमाणपत्र दिले होते. यामध्ये काही


बामणोली ग्रामस्थांनी मोबाईल टॉवर विरोधात ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढून काम थांबविण्यास भाग पाडले.


पदाधिकाऱ्यांनी मनमानी कारभार करत इतर सदस्यांना अंधारात ठेवले. याची माहिती बाकीच्यांच्या मिळताच त्यांनी संताप व्यक्त केला. भागातील ग्रामस्थांना सोबत घेऊन ते एकवटले व बामणोली ग्रामपंचायतीकडे त्यांनी तक्रारी केल्या. सुरवातीला त्यांना न जुमानता काम सुरूच ठेवण्यात आले. याच्या निषेधार्थ काल मंगळवार दि. २३ रोजी ग्रामस्थांनी बामणोली


ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली.


मनमानीविरोधात एकवटत ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले. चुकीच्या पध्दतीने काम कशासाठी करता?  असा जाब विचारत रोष व्यक्त केला. यानंतर ग्रामपंचायतीने ते मोबाईल टॉवरचे नाहरकत प्रमाणपत्र तातडीने रद्द करत सुरू असणारे काम थांबवण्याबाबत आदेश दिले. तसेच या आंदोलनातील सहभागी सदस्य अमित आवळे सदस्य स्वरूपा व वारणकर प्रशांत चौगुले स्वप्नील मोरे मेजर आनंद गवडर हर्षल पाटील प्रवीण शेजाळ नितीन जाधव कबीर शेख मयूर जाधव हर्षल जावळेकर विनायक निंबाळकर नरेंद्र मोहिते विष्णु शिंदे तुषार बोराडे आदित्य जाधव राहुल गवळी सुनील पाटील आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.