Header Ads

श्री सत्य साई रन अँड राईड मॅरेथॉन कोल्हापूरात संपन्न.

 श्री सत्य साई रन अँड राईड मॅरेथॉन कोल्हापूरात संपन्न.

-------------------------------------------

कळे प्रतिनिधी

सुनिल मोळे

-------------------------------------------

क्रिडा मंत्रालय भारत सरकार यांच्या फिट इंडिया चळवळी अंतर्गत भगवान श्री . सत्यसाई बाबांच्या शंभराव्या जन्म वर्षां निमित्य श्री. सत्यसाई सेवा संघटना भारत देश, यांचे मार्फत देशातील 60 शहरांमध्ये भगवान श्री. सत्यसाई बाबांच्या संदेशानुसार, "सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा" यास अनुसरून आपण सर्व एक आहोत ही सामूहिक ऐक्याची भावना समाजा मध्ये वाढवण्यासाठी श्री. सत्यसाई रण अँड राईड मॅरेथॉन चे आयोजन सत्य साई सेवा संघटना कोल्हापूर यांचे मार्फत करण्यात आले .यानुसार आज रोजी कोल्हापूर शहरात छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटीच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहपासून 3 कि.मी. , 5 कि.मी व 10 कि.मी. साठी श्री. सत्यसाई रन अँड राईड मॅरेथॉन संपन्न झाले, यासाठी प्रमुख पाहुणे योगेशकुमार गुप्ता,पोलीस अधीक्षक कोल्हापूर जिल्हा , भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन श्री दिगंबर मेडशिंगे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली.या मॅरेथॉन मध्ये कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील 4500 युवक, युवती, जेष्ठ महिला व जेष्ठ नागरीक यांनी नोंद करून 3500 पेक्षा जास्त जणांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला . यावेळी श्री सत्यसाई सेवा संघटना राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी लक्ष्मीकांत शर्मा राष्ट्रीय युथ प्रमुख भारत देश, मुरली जाजू राष्ट्रीय अध्यात्मिक प्रमुख भारत देश, धर्मेश वैद्य राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य, निशिकांत पाटील राज्य युथ प्रमुख महाराष्ट्र राज्य, सुरेश वाघ सेवा दल प्रमुख महाराष्ट्र राज्य, दिलीप भामे सहाय्यक सेवा दल प्रमुख महाराष्ट्र राज्य, कृष्णा रेवनकर सहाय्यक राष्ट्रीय आध्यात्मिक प्रमुख भारत देश, बजरंग माळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष, कुबेर लंगरे कोल्हापूर जिल्हा अध्यात्मिक प्रमुख, , भगवान बुचडे, बच्चन लव्हटे कोल्हापूर जिल्हा युथ प्रमुख, दत्ता पाटील सेवादल प्रमुख, प्रसाद धारवाडकर जॉईंट जिल्हा युथ प्रमुख अनिल मोळे कळे समिती प्रमुख ,व ज्येष्ठ साईभक्त राजेंद्र मांगलेकर,

साईश मोळे ,पंकज इंजुळकर, रवींद्र तुळसावडे ,सुनिल तुळसावडे यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो साईभक्त व साईसेवक हजर होते.

No comments:

Powered by Blogger.