महामंडळाचे परिपत्रकच चालक-वाहकांना देऊन केल्या सूचना.
महामंडळाचे परिपत्रकच चालक-वाहकांना देऊन केल्या सूचना.
-----------------------------------
जयसिंगपूर प्रतिनिधी
नामदेव भोसले
------------------------------------
उदगाव, तमदलगे, निमशिरगाव फाट्यावर बस थांबवा अन्यथा कारवाई
जयसिंगपूर पोलीस ठाण्यात सांगली-कोल्हापूर विभागाच्या एसटी अधिकाऱ्यांबरोबर 12 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीनुसार एसटी महामंडळाने बस थांब्याचे परिपत्रक काढले आहे. उदगाव, तमदलगे, निमशिरगाव फाटा याठिकाणी सांगली-कोल्हापूर मार्गावर धावणाऱ्या सर्व एसटी बसेस थांबविण्याचे आदेश झाले आहेत. या 3 थांब्यासाठी येता-जाता 10 मिनिटाची वेळ वाढवून दिली आहे.
दरम्यान, तमदलगे येथे विद्यार्थी व प्रवाशांनी महामंडळाची परिपत्रक व गुलाबाचे फूल देऊन सांगली-कोल्हापूर बसच्या चालक-वाहकांना देऊन त्यांचा सत्कार केला व बस न थांबविल्यास आपल्यावर महामंडळाकडून कारवाई होणार असल्याची आठवण करून दिली. या अनोख्या उपक्रमामुळे उदगाव, तमदलगे, निमशिरगाव फाटा येथे एसटी बसेस थांबव्याव्याच लागणार आहेत.
पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीनंतर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सांगली-कोल्हापूर धावणाऱ्या सर्व एसटी बसेससाठी उदगहोते, तमदलगे, निमशिरगाव फाटा थांबा निश्चित करण्यात आला आहे. या ३ थांबासाठी 10 मिनिटे वेळ वाढवून देण्यात आली आहे. शिवाय प्रवाशी व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या बदलाची नोंद ईटीआयएम, व्हीटीएस कार्यप्रणाली व टी2ए यामध्ये घेण्यात आली आहे. तसेच या 3 थांब्यावर एसटी बसेस न थांबविल्यास चालक-वाहकावर कारवाई होणार आहे.
या आदेशाची अंमलबजावली सोमवारपासून झाली आहे. याची आठवण करून दिली आहे. या आदेशाच्या प्रती चालक-वाहकांना देऊन या थांब्यावर बसेस थांबविण्याबाबत सूचना करून सत्कार केला. यावेळी रोहित मलमे, प्रकाश सादळे, आदगोंडा सुर्यवंशी, शिताराम खाडे, विलास सुतार, सीमा सादळे, प्राजक्ता कोळी, अंजली पाटील, श्रृती खाडे यांच्यासह विद्यार्थी प्रवाशी उपस्थित हो

No comments: