काँग्रेसच्या माजी जि.प. सदस्या रंजनाताई कोळी यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह यड्रावकर गटात प्रवेश.
काँग्रेसच्या माजी जि.प. सदस्या रंजनाताई कोळी यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह यड्रावकर गटात प्रवेश.
----------------------------------
जयसिंगपूर प्रतिनिधी
नामदेव भोसले
----------------------------------
शिरोळ तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून काँग्रेसला मोठा धक्का देणारी घटना घडली आहे. काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्या रंजनाताई कोळी व सूर्यकांत कोळी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह यड्रावकर गटात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रंजनाताई कोळी व सूर्यकांत कोळी यांनी अनेक वर्षे काँग्रेस पक्षात सक्रियपणे काम केले आहे. संघटन बांधणी, निवडणूक प्रचार तसेच सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून तसेच त्यांनी आपल्या कार्यकालात केलेल्या विकासाभिमुख कार्यामुळे त्यांनी तालुक्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीत विकासाला प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वासोबत राहणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी राजर्षी शाहू विकास आघाडीत प्रवेश केल्याचे जाहीर केले.
प्रवेशप्रसंगी बोलताना रंजनाताई कोळी म्हणाल्या की, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, शेतीपूरक योजना अशा विविध क्षेत्रांत भरीव काम होत आहे. हा विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांना प्रभावीपणे न्याय देण्यासाठी आम्ही यड्रावकर गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सूर्यकांत कोळी यांनीही विकासाभिमुख राजकारण हाच आपला पुढील मार्ग असल्याचे स्पष्ट केले.
या जाहीर प्रवेशावेळी पप्पू जाधव, पप्पू गुरवान, उमेश चौगुले, सुरज मुजावर, बाउद्दिन मुजावर, बाहुबली मालगावे, विपुल कांबळे, सचिन कोळी, अक्षय कोळी, विशाल कोळी, रोहित कोळी, रोहन कोळी, पिराप्पा कोळी, सुधाकर बरगाले, सुरज मुजावर या कार्यकर्त्यांच्या बरोबर कल्लाप्पा कोईक, विश्वास बालिघाटे, बाबुराव कोईक, रावसाहेब यमकनमर्डे, अविनाश पाटील, प्रकाश चौगुले, दिलीप पाटील, विजय खंजिरे, मोहम्मदअली मुजावर, मुसा मुजावर, किरण कोईक, प्रवीण दानोळे, अक्षय हसुरे, अर्जुन मगदूम, भास्कर कुंभार, अजित चौगुले, तन्वीर मुजावर यांच्यासह आघाडीचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रवेशामुळे राजर्षी शाहू विकास आघाडीची ताकद आणखी वाढली असून येणाऱ्या निवडणुकांत आघाडीला याचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

No comments: