Header Ads

स्वाभिमानीच्या सागर शंभुशेटे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह यड्रावकर गटात प्रवेश.

 स्वाभिमानीच्या सागर शंभुशेटे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह यड्रावकर गटात प्रवेश.

-------------------------------------

जयसिंगपूर प्रतिनिधी

नामदेव भोसले

-------------------------------------

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लढवय्ये शिलेदार आणि माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचे विश्वासू सहकारी सागर शंभुशेटे यांच्यासह नांदणी जिल्हा परिषद मतदार संघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी या पुढच्या काळात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्धार घेत यड्रावकर गटात प्रवेश केला.

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणजे विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व असून त्यांच्या माध्यमातून पक्ष, संघटना, गट तट, जातपात न पाहता काम केले जाते अलीकडच्या काळातील तालुक्याच्या विकासाची दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी निर्माण केलेली ओळख कौतुकास्पद आहे, त्यांच्या कामाची पद्धत पाहूनच कोणतीही अपेक्षा न ठेवता या पुढच्या काळात त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत राहू असे सांगत सागर शंभुशेटे यांनी आपण सर्वप्रथम आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात ज्येष्ठ नेते शामरावआण्णा पाटील यड्रावकर यांच्यासोबत केली होती. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी आम्हाला मिळाली होती, आज पुन्हा त्यांचे कर्तबगार सुपुत्र राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळत आहे, त्यामुळे आपण कुठेही इकडे तिकडे गेलो नसून आपल्या मूळ घरात परत आलो असल्याची भावना होत असल्याचे सांगितले. पंचवीस वर्ष सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर सोडून आपण निष्ठेने काम केले या पुढच्या काळात देखील आपल्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा यासाठी आपण ही भूमिका घेतली असल्याचेही ते म्हणाले, 

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यावेळी सर्वांचा स्वागत पर सन्मान केला, सागर सह त्याच्यासोबत आलेल्या कोणाचाही अनादर होणार नाही, प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल सर्वांना सोबत घेऊन हातात हात घालून आपण या पुढच्या काळात काम करत राहू अशा भावना व्यक्त केल्या, स्वागत बाबासाहेब बागडी यांनी तर आभार प्रा. राकेश पाटील यांनी मानले. यावेळी शरद साखर कारखान्याचे संचालक संजय बोरगावे, जिल्हा सूतगिरणीचे संचालक प्रकाश लठ्ठे, यांच्यासह नांदणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष पापालाल शेख, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अल्पना कोळी, स्वाती माळी, दिलीप परीट, माजी सरपंच विद्या संकेश्वरे, चर्मकार समाज संघटनेचे अध्यक्ष दादा चव्हाण यांच्यासह नांदणी जिल्हा परिषद मतदार संघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.