मुरगुडमधे छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा.
मुरगुडमधे छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा.
-----------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
-----------------------------
छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक हा संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व
स्वराज्याच्या अखंडतेची शपथ
बलिदानाने तेजस्वी झालेल्या इतिहासाची सुरुवात
हा दिवस स्वराज्याच्या इतिहासातील अतिशय निर्णायक आणि प्रेरणादायी पर्व ठरतो.
राज्याभिषेकाचा विधी अधिक तपशील राज्याभिषेक अत्यंत शास्त्रोक्त, वैदिक आणि प्रतिष्ठेने पार पडला.गंगाजल, तीर्थजल व पंचामृताने अभिषेक वेद, पुराणे व राजसूय परंपरेनुसार मंत्रोच्चार छत्र, चामर, तलवार, यांचे विधिवत पूजन
छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन मुरगूड शहरातील शिवतीर्थ येथे उत्साहात साजरा झाला. येथील नामदेवराव भराडे व शिवाजी चौगले यांच्या हस्ते छत्रपती
संभाजी महाराज यांच्या मूर्तीस दुग्धाभिषेक व नंतर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी शिवभक्त सर्जेराव भाट, तानाजी भराडे, धनंजय सूर्यवंशी, जगदीश गुरव,अमोल मेटकर, रघुनाथ बोडके, प्रकाश पारिषवाड, प्रफुल कांबळे, संकेत शहा, अमर सुतार सागर चौगले विशाल कापडे, नामदेव पवार शिवभक्त व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: