कृषी पंपांना दिवसा वीज "या मुख्यमंत्र्याच्या घोषणेला महावितरण कडून वाटाण्याच्या अक्षता.
"कृषी पंपांना दिवसा वीज "या मुख्यमंत्र्याच्या घोषणेला महावितरण कडून वाटाण्याच्या अक्षता.
----------------------कळे प्रतिनिधी
सुनिल मोळे
9890908047
-----------------
कळे:- महावितरण कंपनीकडून गेल्या काही दिवसापासून सहकारी पाणी पुरवठा संस्थां व वैयक्तिक कृषिपंपधारक शेतकरी यांच्या कृषीपंपांना योग्य दाबाने वीज पुरवठा होत नाही. कृषीपंपासाठी दिवसा आठ तास वीज मिळत आहे. तिही कमी दाबाने व वरचेवर खंडीत होऊन. त्यामुळे पाण्याचे फेर मिटत नाहीत. लो- होल्टेजमुळे कृषिपंप सुरु होत नाहीत. सध्या उन्हाचा तडाका वाढत असून या काळात कृषीपंपांना किमान १२ तास वीज मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांची असताना महावितरण कंपनी कडून कृषिपंपाना कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. अधून मधून वरचेवर दिवसातून किमान तीन ते चार वेळेस वीज खंडीत होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पाण्याचे फेर मिटत नाहीत. परिणामी उभी पिके वाळत आहेत.
या कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे सहकारी पाणी पुरवठा संस्था व शेतकऱ्यांचे मोटर पंप वरचेवर बंद पडत आहेत. काही मोटरपंप योग्य दाबाच्या वीजे अभावी चालुच होत नाहीत.
*वरचेवर विद्युत पुरवठा खंडीत झालेमुळे व कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्यामुळे सहकारी पाणी पुरवठा संस्थांचे मोटरपंप खराब होऊन नाहक दुरुस्तचा खर्च वाढत आहे. या पाणी पुरवठा संस्था ४० ते ५० वर्षापुर्वीच्या आहेत . मोटर पंप वारंवार बंद होऊन चालू केल्यामुळे पाईपलाईनवर त्याचे प्रेशर येऊन लिकेजचे प्रमाण वाढत आहे.* (गणपती पाटील चेअरमन केदारलिंग पाणीपुरवठा संस्था. काटे भोगाव)
त्यामुळे शेतकऱ्यांचे न भरुन येणारे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार आहे.
पन्हाळा तालुका शेतकरी संघटना अध्यक्ष श्री.बबन खाटांगळेकर म्हणतात की..
१) सर्वच कृषिपंपाना दिवसा अखंडीत 10 तास वीज मिळावी.
२) दिवसा 10 तासामध्ये जेवढावेळ वीज जाईल तेवढावेळ त्याच दिवशीthis वीज वाढवून मिळावी.
३) सर्वच कृषिपंप व सहकारी पाणी पुरवठा संस्थांना योग्य दाबाने वीज पुरवठा व्हावा.
४ ) नदीकाठच्या कृषिपंपांना सोलर सक्ती करु नये त्यांना फिडरवरुन वीज कनेक्शन द्यावीत.
५) जर महावितरणच्या चुकीमुळे शेतकऱ्यांची पिके वाळून नुकसान झाल्यास त्याची भरपाई महावितरणने द्यावी.
मुख्यमंत्र्याच्या दिवसा लाईट घोषणेला महावितरण कडून हरताळा फासला जात आहे. ज्या दिवशी जितका वेळ वीज खंडित होईल त्या दिवशीच वीज उपलब्ध करून देण्याचे होते. अशी सर्व माहिती शेतकरी संघटनेचे पन्हाळा तालुकाध्यक्ष बबन खाटांगळेकर यांनी दिली.

No comments: