Header Ads

आमदार अमोल खताळ यांची खामुंडीच्या श्री काळभैरवनाथ देवस्थानाला भेट; ग्रामस्थांनी केला यथोचित सन्मान.

आमदार अमोल खताळ यांची खामुंडीच्या श्री काळभैरवनाथ देवस्थानाला भेट; ग्रामस्थांनी केला यथोचित सन्मान.

----------------------------
आळेफाटा (प्रतिनिधी):
कैलास बोडके.
-------------------------

संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांनी जुन्नर तालुक्यातील खामुंडी येथील श्री काळभैरवनाथ देवस्थानाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान देवस्थान ट्रस्ट व गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

  श्री काळभैरवनाथाचे दर्शन घेतल्यानंतर आमदार खताळ यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. त्यांनी देवस्थानच्या विकासकामांबाबत ट्रस्ट पदाधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. भेटीदरम्यान उपस्थित भाविकांशी त्यांनी संवाद साधत गावाच्या समस्या ऐकून घेतल्या.

यावेळी बोलताना आमदार खताळ म्हणाले, "खामुंडीचे श्री काळभैरवनाथ देवस्थान हे जुन्नर परिसरातील श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र आहे.ग्रामस्थांनी एकत्र येऊन देवस्थानची जोपासना करणे हीच खरी भक्ती आहे."

या वेळी देवस्थान ट्रस्टचे खजिनदार मारुती कदम , विश्वस्त अरुण बोडके, गणपत कोकाटे,शहाजी जाधव,व्यवस्थापक बबन डुंबरे सामाजिक कार्यकर्ते कैलास बोडके, केशव क्षीरसागर, सह्याद्री करिअर अकॅडमीचे मयुर डुंबरे आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. गावात आलेल्या लोकप्रतिनिधीचा सन्मान करण्याची स्थानिक परंपरा यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसून आली.

जुन्नर तालुक्यातील खामुंडी येथील श्री काळभैरवनाथ मंदिर भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे . आमदारांच्या या भेटीने गावात उत्साहाचे वातावरण होते.

No comments:

Powered by Blogger.