Header Ads

सरस्वती विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

 सरस्वती विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा.

------------------

चंदगड तालुका प्रतिनिधी 

आशिष पाटील.

-------------------------

श्री सरस्वती विद्यालय, कालकुंद्री येथे१ मे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाच्या प्रांगणात *जेष्ठ अध्यापक श्री व्ही आर मोहनगेकर सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.* ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत सादर करून उपस्थितांनी देशभक्तीची भावना व्यक्त केली.

         विद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत सादर करून उपस्थितांचे मने जिंकली. विद्यालयातील ज्येष्ठ अध्यापक श्री एम व्ही कानूरकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत महाराष्ट्राच्या इतिहासाची व संस्कृतीची माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांनी देशाच्या प्रगतीत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.

        कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक ई. एल. पाटील, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.