शामराव पाटील शिक्षक यांचा सेवानिवृत्ती चा नाविन्य उपक्रम
शामराव पाटील शिक्षक यांचा सेवानिवृत्ती चा नाविन्य उपक्रम.
--------------------------------------सेवानिवृत्ती कार्यक्रमाचा डामडौल न करता पाच शाळांना १ लाख रुपयांची मदत करून वालूर (ता.शाहूवाडी) येथील प्राथमिक शाळेचे विषय शिक्षक शामराव पाटील (शिंपे)यांनी वेगळा आदर्श इतरांपुढे ठेवला आहे.मदतीचा १ लाख रुपयांचा धनादेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जास्मीन व जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांचेकडे त्यांनी सुपूर्द केला.
सेवानिवृत्ती कार्यक्रम म्हणजे हार,तुरे,फेटे आणि जेवणावळी अशी पारंपारिक पध्दत सर्वत्र रूढ झाली आहे.याला फाटा देत आपण ज्या शाळेत शिक्षणाचा श्रीगणेशा केला त्या मूळ शिंपे गावच्या शाळेस व ज्या शाळांमध्ये ३४ वर्षे शिक्षकी सेवा बजावली त्या खोगेवाडी, शिरगांव,मोळवडे,वालूर अशा एकूण ५ शाळांना १ लाख रुपयांची मदत करून शामराव पाटील यांनी सेवानिवृत्ती घेतली.त्यांच्या या कृतज्ञतेस त्यांच्या कुटुंबानेही मन्यता दिली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जास्मीन, जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर,शाहूवाडीचे माजी गट शिक्षणाधिकारी डॉ.विश्वास सुतार,मोळवडेचे शाळा समिती अध्यक्ष शिवाजी जाधव,आबा गुरुजी शिंपेकर,वर्षाराणी पाटील,आदी यावेळी उपस्थित होते

No comments: