आदिशक्ती अभियान व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान पुरस्कारात आलेल्या ग्रामपंचायतीचा सत्कार.
आदिशक्ती अभियान व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान पुरस्कारात आलेल्या ग्रामपंचायतीचा सत्कार.
सरपंच संघटना तालुका पुसदचा पुढाकार.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~आदिशक्ती व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर पुरस्कार जाहीर झालेल्या ग्रामपंचायतीचा सत्कार सरपंच संघटना पुसद यांच्यावतीने पंचायत समिती सभागृह पुसद येथे घेण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आशिष काळबांडे सरपंच संघटना तालुकाध्यक्ष, तर प्रमुख पाहुणे अमोल कुमार अंदेलवाड गटविकास अधिकारी पंचायत समिती पुसद, संजय राठोड सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती पुसद, विलास पिंपळे विस्तार अधिकारी, संतोष डाखोरे विस्तार अधिकारी, हे उपस्थित होते.
आदिशक्ती अभियानात जिल्हास्तरावर धनकेश्वर ग्रामपंचायत प्रथम तर चोंढी ग्रामपंचायत द्वितीय क्रमांकावर पुरस्कारा करिता घोषणा झाली. तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात जिल्हास्तरावर बान्सी ग्रामपंचायत तर तालुकास्तरावर चोंढी, बान्शी, मोखाड,विशेष पुरस्कार धनकेश्वर,मांडवा पुरस्कारासाठी जाहीर झालेल्या ग्रामपंचायतीवर कौतुकाची थाप म्हणून तेथील सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्याचे पुष्पगुच्छ,शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत हराळ उपसरपंच गौळ, व सूत्रसंचालन अर्चना पवार सरपंच, तर आभार प्रदर्शन संभाजी चिरंगे सरपंच यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विविध ग्रामपंचायतीचे सरपंच तथा प्रशासक , ग्रामविकास अधिकारी, तसेच सरपंच संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: